राष्ट्रीय

सुरक्षा दलाच्या चौकीवर दहशतवाद्यांचा गोळीबार; CRPF चे तीन जवान जखमी

जम्मू-काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात मोटारसायकलवरून आलेल्या अज्ञात दहशतवाद्यांनी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) चौकीवर अचानक अंधाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात सीआरपीएफचे तीन जवान गंभीर जखमी झाले असून, त्यातील एकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Swapnil S

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात मोटारसायकलवरून आलेल्या अज्ञात दहशतवाद्यांनी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) चौकीवर अचानक अंधाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात सीआरपीएफचे तीन जवान गंभीर जखमी झाले असून, त्यातील एकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात सुरक्षा यंत्रणा सतर्क करण्यात आली आहे.

बुधवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास मीर बाजार परिसराजवळ ही घटना घडली. हे ठिकाण जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गापासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर आहे. हल्ल्यानंतर हल्लेखोर मोटारसायकलवरून पळून जाण्यात यशस्वी झाले.

सुरक्षेच्या कारणास्तव संपूर्ण परिसर ताबडतोब सील करण्यात आला असून, हल्लेखोरांच्या शोधासाठी सुरक्षा दलांनी मोठी मोहीम हाती घेतली आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

मदर डेअरी, अमूल दूध महागले; प्रतिलिटर २ ते ४ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू

Mumbai : दिवाळीत हवेचे 'दिवाळे'! नेव्ही नगरमध्ये AQI ४९७, तर शिवडीत ४५२ वर पोहोचला

राज्यात लवकरच समान नागरी कायदा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पुनरुच्चार

नवी मुंबई सर्वाधिक स्वच्छ शहर; देशातील सर्वेक्षण २०२५-२६ मध्ये पटकावला प्रथम क्रमांक

कोकण किनाऱ्यांचा जागतिक गौरव; गुहागर, लाडघर, श्रीवर्धन समुद्रतटांना आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठेचा 'ब्ल्यू फ्लॅग' पुरस्कार