उंची लहान, पण कीर्ती महान! ३ फूट उंची, २० किलो वजन असूनही डॉक्टर बनण्याचे स्वप्न पूर्ण 
राष्ट्रीय

उंची लहान, पण कीर्ती महान! ३ फूट उंची, २० किलो वजन असूनही डॉक्टर बनण्याचे स्वप्न पूर्ण; जामनगरच्या गणेशची संघर्षमय वाटचाल

२७ नोव्हेंबरपर्यंत जामनगरमधील तख्तसिंहजी हॉस्पीटल हे फक्त भावनगरमधील सर्वात मोठे हॉस्पीटल आणि मृतदेह दान करण्याचे ठिकाण म्हणून ओळखले जायचे. पण, आता हेच हॉस्पीटल सर्वांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले आहे. याचे कारण म्हणजे ३ फूट आणि अवघ्या २० किलो वजनाचा डॉक्टर गणेश बरैय्या. २५ वर्षांच्या गणेशची आतापर्यंतची संघर्षमय वाटचाल थक्क करणारीच आहे.

Swapnil S

मेल्विन थॉमस/जामनगर

२७ नोव्हेंबरपर्यंत जामनगरमधील तख्तसिंहजी हॉस्पीटल हे फक्त भावनगरमधील सर्वात मोठे हॉस्पीटल आणि मृतदेह दान करण्याचे ठिकाण म्हणून ओळखले जायचे. पण, आता हेच हॉस्पीटल सर्वांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले आहे. याचे कारण म्हणजे ३ फूट आणि अवघ्या २० किलो वजनाचा डॉक्टर गणेश बरैय्या. २५ वर्षांच्या गणेशची आतापर्यंतची संघर्षमय वाटचाल थक्क करणारीच आहे.

ट्रॉमा सेंटरच्या मेडिकल ऑफिसरपदी नेमणूक झालेल्या गणेशची गाथा सर्वांसाठी प्रेरणादायी अशीच आहे. गणेश यांना डॉक्टर होण्यापासून रोखण्यासाठी वैद्यकीय मंडळाने आपली सर्व ताकद लावली. शरीराचा ७२ टक्के भाग लोकोमोटर विकलांगतेमुळे प्रभावित असूनही, त्यांनी आज डॉक्टर बनण्याचे आपले स्वप्न पूर्ण केले आहे.

नीट परीक्षा पास झाल्यानंतर भावनगरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी गेल्यावर गणेश यांना वैद्यकीय मंडळाने प्रवेश देण्यास स्पष्ट नकार दिला. इतक्या कमी उंचीमध्ये तुम्ही रुग्णांची तपासणी आणि ऑपरेशन थिएटरमधील काम कसे करू शकाल?' असे कारण देत, वैद्यकीय मंडळाने त्यांची शारीरिक मर्यादा दाखवली. पण गणेश आणि त्यांच्या कुटुंबियांनी याबाबत गुजरात उच्च न्यायालयात धाव घेतली. तिथेही डाळ शिजणार नाही, याची कल्पना आल्यावर गणेश यांनी थेट सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. प्रदीर्घ कायदेशीर लढाई लढल्यानंतर, सर्वोच्च न्यायालयाने गणेश यांच्या बाजूने ऐतिहासिक निर्णय दिला आणि महाविद्यालयाला प्रवेश देण्याचे आदेश दिले. या निर्णयामुळे गणेश यांच्या डॉक्टर बनण्याच्या मार्गातील सर्वात मोठी अडचण दूर झाली.

भावनगर वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेतल्यानंतर गणेश यांनी आता पाच वर्षांचा एमबीबीएस अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण केला. एवढेच नव्हे, तर इंटर्नशिपच्या काळातही कठोर मेहनत घेत त्यांनी आपले लक्ष्य साध्य केले. रुग्णालयाचे बेड उंच असल्यामुळे गणेश तपासणीसाठी स्टूलचा वापर करतात. रुग्णांची तपासणी करताना ते आपले पाय लांब करून काम करतात. तपासणी करण्यासाठी आल्यावर डॉक्टर गणेश यांना पाहून रुग्णही आश्चर्यचकित होतात, पण नंतर त्यांच्या प्रेमाच्या आणि आत्मविश्वासाच्या उपचारांमुळे समाधानाने उपचार करून घेतात.

“मी माझ्या उंचीमुळे कधीच घाबरलो नाही. फक्त लोकांच्या चुकीच्या मानसिकतेचा शिकार होत गेलो. सर्वांसाठी वेदना या सारख्याच असतात, त्यामुळे माझी उंची ही कधीच अडथळा बनली नाही,” असे डॉ. गणेश आत्मविश्वासाने सांगतात.

सभापती, अध्यक्षांचे  निर्देश म्हणजे ब्रह्मवाक्य नव्हेत;  मुख्यमंत्र्यांनी करून दिली मर्यादांची जाणीव, छेडली नवी चर्चा 

मोदी सरकार 'ॲक्शन मोड'मध्ये; इंधन, खते इ.साठी सात नवे गट स्थापन

खरातला २९ मार्चपर्यंत मिळाली पोलीस कोठडी; न्यायालय परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

अशोक खरात प्रकरण : सरकारी अधिकारीही पोलिसांच्या रडारवर

धर्मांतरितांना सरसकट 'मागास'चे लाभ नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल