समान नागरी कायद्याला JDU ची सशर्त तयारी संग्रहित छायाचित्र
राष्ट्रीय

समान नागरी कायद्याला JDU ची सशर्त तयारी

'समान नागरिक संहिता' विधेयकातील तरतुदी जर आक्षेपार्ह नसतील, तर त्यांची आपला पक्ष या विधेयकाला विनाकारण विरोध करणार नाही, असे बिहारचे उपमुख्यमंत्री आणि जदयूचे नेते विजयकुमार चौधरी यांनी मंगळवारी स्पष्ट केले.

Swapnil S

पाटणा : 'समान नागरिक संहिता' विधेयकातील तरतुदी जर आक्षेपार्ह नसतील, तर त्यांची आपला पक्ष या विधेयकाला विनाकारण विरोध करणार नाही, असे बिहारचे उपमुख्यमंत्री आणि जदयूचे नेते विजयकुमार चौधरी यांनी मंगळवारी स्पष्ट केले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी "२०२९ पर्यंत सर्व एनडीएशासित २२ राज्यांमध्ये यूसीसी लागू केला जाईल" असे विधान केल्यापासून राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. या पार्श्वभूमीवर जद(यु) पक्षाच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत माजी विधानसभा अध्यक्ष विजय चौधरी यांनी पक्षाची भूमिका मांडली.

मुख्य विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रीय जनता दलाने (आरजेडी) "हा कायदा मुस्लिमांच्या हिताच्या विरोधात आहे" असा आरोप करत बिहारमध्ये यूसीसी लागू होऊ न देण्याचा इशारा दिला आहे. आरजेडीच्या या भूमिकेपासून अंतर राखत चौधरी म्हणाले, आम्ही आरजेडीच्या पावलावर पाऊल ठेवून चालतो हा भ्रम मनातून काढून टाका. आम्ही बिहारमधील सत्ताधारी एनडीएचा भाग आहोत आणि आघाडीच्या सर्व घटक पक्षांशी चर्चा करूनच योग्य तो निर्णय घेऊ.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

UPI पेमेंटला शुल्क लागू; २००० रु.हून अधिक - ०.४ टक्के शुल्क, २००० पर्यंत - मोफत

शिवसेना फूटप्रकरणी घटनेचे उल्लंघन नाही; एकनाथ शिंदेंच्या वकिलांचा दावा

दिघीमध्ये जहाजबांधणी; भारतातील सर्वात मोठा प्रकल्प रायगडमध्ये, माझगाव डॉकची २७ हजार कोटींची गुंतवणूक

BEST बसचालकांची बेदरकारी वाढली; ८९८ जणांवर कारवाई, पैकी ७८९ कंत्राटी चालक, पादचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

Mumbai : गोरेगावात बेस्टच्या बसचा अपघात; २ जण जखमी, Video