राष्ट्रीय

केवळ कुत्र्याने माग काढला म्हणून गुन्हा सिद्ध होत नाही ;पाटणा उच्च न्यायालयाने मृत्यू दंड रद्द केला

Swapnil S

पाटणा : एक महत्वपूर्ण निर्णय देताना पाटणा उच्च न्यायालयाने १२ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार व हत्या करणाऱ्या व्यक्तीला झालेली मृत्यूदंडाची शिक्षा रद्द केली आहे. पोलिसांचा स्नीफर डॉग म्हणजे माग काढणारा कुत्रा त्याच्या घरात घुसला हाच एकमेव पुरावा त्या आरोपीच्या विरोधात होता. उच्च न्यायालयाने केवळ कुत्रा घरात शिरला म्हणून या एका आधारावर त्याला शिक्षा देणे योग्य ठरणार नाही, असे स्पष्टीकरण देत सजा रद्द केली.

न्या. आशुतोष कुमार आणि आलोक कुमार पांडे यांच्या खंडपीठाने निम्न न्यायालयाने दिलेली सजा शुक्रवारी रद्द केली. कुत्र्याच्या कौशल्यावर इतके अवलंबून राहिलो तर ते न्यायदान प्रक्रियेस परवडणारे नाही असे मत खंडपीठाने व्यक्त केले. त्या कुत्र्याने कोणतीही चूक केली नाही हे निम्न न्यायालयाने कसे ग्राह्य धरले असा सवाल देखील या खंडपीठाने केला. कारण तो कुत्रा आणखी एका घरात शिरल्याचा पुरावा देखील उपलब्ध होता. कुत्र्यांची घृणेंद्रीये अत्यंत तीक्ष्ण असतात आणि बारीकाहून बारीक फरक ते करु शकतात यात वाद नाही. असे कुत्रे पोलिसांना गुन्हे अन्वेषण कार्यात खूप मदत देखील करतात हे देखील खंडपीठाने मान्य केले. ते गुन्हा शोधण्यासाठी सहाय्यक ठरु शकतात. पण, ते पुरावा होऊ शकत नाहीत, असे मत खंडपीठाने व्यक्त केले.

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस