नवी दिल्ली : भारताचे नवे सरन्यायाधीश म्हणून संजीव खन्ना यांच्या नियुक्तीवर शिक्कामोर्तब झाले आहे. केंद्र सरकारने त्यांच्या नियुक्तीची अधिसूचना जारी केली आहे.
मावळते सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी न्या. खन्ना यांच्या नावाची शिफारस सरकारला केली होती. येत्या १० नोव्हेंबरला चंद्रचूड यांचा कार्यकाळ संपणार आहे. त्यानंतर ११ नोव्हेंबरपासून न्या. खन्ना सरन्यायाधीशपदाची सूत्रे स्वीकारतील.
केंद्रीय कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी ट्विट करत न्या. खन्ना यांची नियुक्ती करण्यात आल्याचे जाहीर केले. ११ नोव्हेंबरपासून न्या. संजीव खन्ना हे सरन्यायाधीश म्हणून काम पाहतील.