राष्ट्रीय

कल्याण बॅनर्जींनी पुन्हा केली उपराष्ट्रपतींची नक्कल; म्हणाले, “हा तर माझा मूलभूत अधिकार”

Rakesh Mali

तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी पुन्हा एकदा उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी नक्कल केली आहे. मिमिक्री करणं ही एक कला आहे. मी मिमिक्री करत राहणार, गरज पडल्यास असं हजार वेळा करणार. हा माझा मूलभूत अधिकार आहे. तुम्ही मला मारु शकतात, मात्र मी मागे हटणार नाही. मी लढत राहणार, असं बॅनर्जी म्हणाले. रविवारी पश्चिम बंगालमध्ये आयोजित एका सभेला संबोधित करताना त्यांनी धनखड यांची नक्कल केली आहे.

 ते पुढे म्हणाले, कोणाला दुखवणे हा माझा हेतू नाही. माझा एक प्रश्न् आहे की ते खरंच (जगदीप धनखड) राज्यसभेत असा व्यवहार करतात? मिमिक्री ही एक कला असून 2014 ते 2019 दरम्यान पंतप्रधानांद्वारा देखील केली गेली आहे.

बॅनर्जी यांनी पुन्हा नक्कल केल्याने जगदीश धनखड यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. ते म्हणाले, जो पीडित असतो त्यालाच माहिती असतं त्याला काय सहन करावं लागतं. त्याला सर्वांचा सामना करावा लागतो. प्रत्येकाकडून अपमान सहन करावा लागतो. तरी देखील आपल्या दिशेने पुढे जावं लागतं, जो रस्ता भारत माताच्या सेवेत जातो.

ते पुढे म्हणाले की, भारत मातेची सेवा करण्यासाठी तुम्हाला लोकांची टीका सहन करणं शिकावं लागेल. मी संविधानिक पदावर असून देखील लोक मला सोडत नाहीत. यामुळे मी माझी मानसिकता बदलायला हवी? यामुळे मी माझा रस्ता सोडून देऊ? नाही. आपल्याला नेहमी धर्माच्या मार्गावे पुढे जायचे आहे. आपल्यावर प्रश्न उपस्थित करणारे लोक जुने टीकाकार आहेत. या लोकांना घाबरायचं नाही, असं देखील धनखड म्हणाले.

काय आहे प्रकरण?

13  डिसेंबर रोजी संसदेत झालेल्या सुरक्षेसंबंधीत त्रुटीवरुन विरोधी पक्षांनी संसदेत गोंधळ घातला. खासदारांनी याबाबत गृहमंत्री अमित शाह यांच्या निवेदनाची मागणी केली. खासदारांनी गोंधळ घातल्याने १४ ते २१ डिसेंबर या काळात राज्यसभा आणि लोकसभेच्या मिळून 146 खासदारांचे हिवाळी अधिवेशन संपेपर्यंत निलंबन करण्यात आले.

 संसदेच्या सुरक्षेसंबंधित त्रुटीवर अमित शाह यांच्या निवेदनाची आणि निलंबित केलेल्या खासदारांचे निलंबन मागे घेण्याची मागणी करत विरोधी पक्षांच्या खासदारांनी संसदेच्या आवारात आंदोलन सुरु केले. यावेळी तृणमूलचे खासदार कल्याण बनर्जी यांनी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी मिमिक्री केली होती. तर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी त्यांचा व्हिडिओ काढला होता. यावर सत्ताधारी पक्षाकडून टीका करण्यात आली होती. दरम्यान, आज पुन्हा बॅनर्जी यांनी धनखड यांची नक्कल केली आहे.  

“शरद पवार साहेबांसोबत राहूनही त्यांनी...” राज ठाकरेंनी केलं अजित पवारांचं कौतुक

"आमच्यासोबत या, तुमची स्वप्नं पूर्ण होतील..."नंदुरबारमधील सभेत मोदींची शरद पवार, उद्धव ठाकरेंना खुली ऑफर

मोठी बातमी! अरविंद केजरीवालांना 'सर्वोच्च' दिलासा; १ जूनपर्यंत अंतरिम जामीन मंजूर

Pradeep Sharma : एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मांना मोठा दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून जामीन मंजूर

Narendra Dabholkar Murder Case: दोघांना जन्पठेप, तिघांची निर्दोष सुटका; ११ वर्षांनी आला निकाल