राष्ट्रीय

भाजपची ४०० पारची घोषणा... वास्तवापासून पळण्याचा प्रयत्न; काँग्रेस नेते कन्हैया कुमार यांचे भाजपवर टीकास्त्र

लोकसभा निवडणुकीत रालोआने ४००चा आकडा ओलांडू असा आत्मविश्वास भाजपने व्यक्त केला आहे. त्यावर कन्हैया कुमार यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि सवाल केला की, तसे असेल तर मग जे नेते काँग्रेसमधून निवडणूक जिंकू शकत नाहीत त्यांना घेऊन काडतुसासारखा वापर भाजप का करीत आहे?

Swapnil S

नवी दिल्ली : भाजपची ‘४०० पार’ ही घोषणा म्हणजे एका विशिष्ट धारणेचे व्यवस्थापन असून अशा प्रकारचे दावे म्हणजे वास्तवतेपासून दूर जाण्याचा पळण्याचा प्रयत्न आहे. कारण सत्ताधारी पक्षाचला पराभवाची भीती वाटत आहे आणि त्याचेच हे प्रतिबिंब आहे, अशी टीका काँग्रेस नेते कन्हैया कुमार यांनी एका मुलाखतीत केली आहे. ही ४०० पार ची घोषणा म्हणजे लोकांनी पट्रोल १०० पार का, असे विचारू नये यासाठी आहे, असेही त्यांनी सांगितले.

लोकसभा निवडणुकीत रालोआने ४००चा आकडा ओलांडू असा आत्मविश्वास भाजपने व्यक्त केला आहे. त्यावर कन्हैया कुमार यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि सवाल केला की, तसे असेल तर मग जे नेते काँग्रेसमधून निवडणूक जिंकू शकत नाहीत त्यांना घेऊन काडतुसासारखा वापर भाजप का करीत आहे?

पूर्वी सत्तेत असलेल्या जुन्या पक्षाला अपयश स्वीकारावे लागले. त्यामुळे लोक भाजपच्या आत्यंतिक टोकाच्या विचारांककडे गेले हे मान्य करत कन्हैया कुमार म्हणाले की, स्थितीमधील बदल ही बाब केवळ काळाशी निगडित आहे. भारतीय समाज हा प्रेम आणि समानतेवर आधारित असून सहजीवन, सह अस्तित्व आणि सहिष्णूतेवर तो समाज उभा आहे.

भाजप '४०० पार'चा नारा देत आहे आणि समजाच्या लढाईत विरोधक मागे पडत आहेत असे वाटत नाही का, असे विचारले असता कन्हैया कुमार म्हणाले, यामध्ये मुळात भाजपाची पराभवासंबंधात निराशा व भीती दिसते.

भारतीय क्रिकेट संघ ऑस्ट्रेलियाशी सामना खेळायला गेला आहे आणि सामन्यापूर्वी त्यांनी ४०० पार असा प्रश्न केला का, त्यांनी तसे विधान केले नाही. त्यांनी आण्ही चांगले खेळू आणि विश्वचषक जिंकू असे म्हटले. परसेप्शन मॅनेजमेंटच्या माध्यमातून वास्तव बदलण्याचा प्रयत्न केला जात आहे, तसेच येथे आहे, असा दावाही कन्हैया कुमार यांनी केला.

ते म्हणाले की, जाणीव वा धारणेच्या व्यवस्थापनाच्या आधारे वास्तव बदलण्याचा दुर्भावनापूर्ण प्रयत्न केला जात आहे. जर आकडा आधीच ४०० ओलांडत असेल, तर वेगवेगळ्या पोशाखांमधून 'वापरलेली काडतुसे' तुमच्या पक्षात समाविष्ट करण्यात काय अर्थ आहे? समजा तुम्ही सामना जिंकत आहात. मग ऑस्ट्रेलियन कर्णधाराला लाच देण्यात किंवा त्याच्या निवृत्त खेळाडूंना सोबत घेऊन जाण्यात काय अर्थ आहे? असाही सवाल कन्हैया कुमार यांनी केला.

काँग्रेसमध्ये राहून कोणी निवडणूक जिंकत नसेल तर त्याचा भाजपमध्ये काय उपयोग, असाही सवाल त्यांनी केला. धारणा व्यवस्थापनाचा हा खेळ असून काँग्रेसला त्याची पुरेपूर माहिती आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. याच प्रकारे इंडिया शायनिंगचा प्रयोग भाजपने त्यावेळी केला त्याचे फळ काय होते, त्यावेळी रालोआचा पराभव झाला व यूपीए विजयी झाला होता.

महाराष्ट्र जनविश्वास अध्यादेश : किरकोळ अपराधासाठी आता फक्त दंड, तुरुंगवास नाही; ७ कायद्यांतील छोटे गुन्हे 'डिक्रिमिनलाइज'

Navi Mumbai : वन खात्याच्या बोटचेप्या धोरणाचा फटका महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना; आंतरराष्ट्रीय विमानतळ, जेएनपीटीसह अनेकांवर परिणाम

तिरुमला तिरुपती देवस्थानास वांद्रे येथील जमीन; ३० वर्षांसाठी नाममात्र १ रुपया भाडे; ३९५ चौ.मी जमिनीवर पार्किंग, कार्यालय

Mumbai : बिग बींची स्मार्ट गुंतवणूक! अमिताभ बच्चन यांनी विकले गोरेगावमधील दोन आलिशान फ्लॅट्स; १३ वर्षांत तब्बल ३.८ कोटींचा नफा

'पान मसाला' जाहिरातीवरून सलमान खानला नोटीस; भाजप नेत्याने दाखल केली तक्रार