राष्ट्रीय

मोठी बातमी! कर्नाटकात RSS वर बंदी घालण्याची तयारी?

काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे पुत्र आणि कर्नाटक सरकारमधील मंत्री प्रियांक खर्गे यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना पत्र लिहून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) कार्यक्रमांवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. या पत्राची दखल घेत सिद्धरामय्या यांनी राज्याच्या मुख्य सचिवांना संपूर्ण प्रकरणाची माहिती घेऊन त्यानंतर आवश्यक ती कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

Swapnil S

बागलकोट : काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे पुत्र आणि कर्नाटक सरकारमधील मंत्री प्रियांक खर्गे यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना पत्र लिहून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) कार्यक्रमांवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. या पत्राची दखल घेत सिद्धरामय्या यांनी राज्याच्या मुख्य सचिवांना संपूर्ण प्रकरणाची माहिती घेऊन त्यानंतर आवश्यक ती कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे नजीकच्या भविष्यात नवा संघर्ष पेटण्याची लक्षणे दिसत आहेत.

राज्याचे मंत्री प्रियांक खर्गे यांच्या प्रस्तावाला भाजपने तीव्र विरोध व्यक्त केला आहे. राज्यातील कर्नाटक सरकार अपयशांवरून जनतेचे लक्ष वळवण्यासाठी एक नवीन मुद्दा उपस्थित करत असल्याचा आरोप भाजपने केला आहे.

काही दिवसापूर्वी उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी विधानसभेत 'आरएसएस'च्या प्रार्थनेच्या दोन ओळी वाचल्या होत्या आणि त्यांचे कौतुक केले होते.

संघ नेहमीच देशरक्षणास तयार

दरम्यान, यावर भाजपच्या नेत्यांनी राज्य सरकारवर आरोप केले आहेत. काँग्रेस पक्षाला 'आरएसएस'ची वाढती लोकप्रियता पचवता येत नाही, ते आता असहिष्णु झाले आहेत. देशभरात अशी कोणतीही घटना घडलेली नाही जिथे 'आरएसएस' सदस्यांनी अनुशासनहीनता दाखवली आहे. काँग्रेस दीर्घकाळापासून 'आरएसएस 'ला विरोध करत असली तरी, संघाची स्वतःची भूमिका आहे आणि ती नेहमीच देशाचे रक्षण करण्यास तयार आहे, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र म्हणाले.

खर्गे यांचे आरोप

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा १०० वा वर्धापन दिन देशभर साजरा केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शताब्दीनिमित्त आयोजित कार्यक्रमात भाग घेतला आणि संघाच्या सन्मानार्थ एक टपाल तिकिट आणि नाणे जारी केले असतानाच दुसरीकडे कर्नाटकात 'आरएसएस 'च्या कार्यक्रमांवर बंदी घालण्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. प्रियांक खर्गे यांनी लिहिलेल्या पत्रामध्ये संघावर असंवैधानिक कारवाया केल्याचा आणि देशाच्या एकता आणि अखंडतेला धोका निर्माण करण्यासाठी तरुणांना आणि मुलांना भडकवण्याचा आरोप केला आहे. खर्गे यांनी आपल्या पत्रात आरएसएसच्या कार्यक्रमांवर बंदी घालण्याची मागणी केली आहे.

ठाकरे बंधूंची यंदा 'एकत्र' दिवाळी! मनसे दीपोत्सवाचे उद्घाटन उद्धव ठाकरेंच्या हस्ते

वडिलांपेक्षा मुलगा वयाने मोठा कसा? सर्वपक्षीय शिष्टमंडळाची निवडणूक आयोगासमोर प्रश्नांची सरबत्ती, राज ठाकरेंच्या प्रश्नांनी वेधले लक्ष

IPS पूरन कुमार प्रकरणाला नवे वळण; तपास करणाऱ्या IAS अधिकाऱ्याचीही आत्महत्या, सुसाइड नोटमध्ये गंभीर आरोप

कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरण : मुख्य आरोपी वीरेंद्र तावडेसह दोघांना जामीन

जैसलमेरमध्ये भीषण अपघात; खासगी बसला अचानक लागली आग, गाडी जळून खाक, ५७ जण करत होते प्रवास