युट्युबर फैजल वानी
युट्युबर फैजल वानी 
राष्ट्रीय

काश्मिरी युट्युबर फैजल वानीला अटक, नुपूर शर्मावर बनवला होता वादग्रस्त व्हिडिओ

वृत्तसंस्था

काश्मीर खोऱ्यातील YouTuber फैसल वानी (Faisal Wani) याने प्रेषित मुहम्मद यांच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या भाजपच्या माजी प्रवक्त्याचा व्हिडिओ पोस्ट केला. या व्हिडिओमध्ये नुपूर शर्मा यांच्या पुतळ्याचा शिरच्छेद करताना दाखवण्यात आले आहे. फैसल वानीचा हा व्हिडिओ पाहताच सोशल मीडियावर व्हायरल झाला. वाढता वाद पाहून फैजलने लोकांची माफी मागितली आणि चॅनलवरून तो व्हिडिओ डिलीटही करण्यात आला. फैजलच्या या व्हिडिओवर कारवाई करत पोलिसांनी त्याला अटक केली.

जम्मू-काश्मीर पोलिसांनी सांगितले की, यूट्यूबरने यूट्यूबवर एक आक्षेपार्ह व्हिडिओ अपलोड केला होता, जो सार्वजनिक शांततेच्या विरोधात आहे. त्याच्या व्हिडिओमुळे सर्वसामान्यांमध्ये भीती आणि चिंता निर्माण झाली आहे. पोलिसांनी सांगितले की, सफा कडल पोलिस ठाण्यात आयपीसीच्या कलम ५०५ आणि ५०६ अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला आहे.

फैजलने शुक्रवारी नुपूर शर्माचा हा आक्षेपार्ह व्हिडिओ पोस्ट केला होता. तो म्हणाला की मी व्हिडिओ बनवला होता पण माझा कोणताही चुकीचा हेतू नव्हता. मी व्हिडिओ डिलीट केला आहे आणि जर कोणाला काही दुखावले असेल तर मी माफी मागतो.

मुंबईत २७ ते २९ एप्रिलदरम्यान उष्णतेची लाट, हवामान खात्याचा इशारा; 'असा' बचाव करा

लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यात ६१ टक्के मतदान; उत्तर प्रदेशात सर्वात कमी प्रतिसाद, तर 'या' राज्यात सर्वाधिक टक्केवारी

जरांगे-पाटील उतरणार विधानसभेच्या मैदानात, राज्यात २८८ जागांवर उमेदवार देणार; प्रस्थापितांना धक्के बसणार?

आता शेतकऱ्यांना मिळणार केवळ ५ मिनिटांत कर्ज; नाबार्ड-आरबीआय इनोव्हेशन हब यांच्यात करार

दुसऱ्या टप्प्यातही यादीत घोळ; अनेकजण मतदानाविना परतले, प्रशासनाची अनास्था कायम