राष्ट्रीय

केजरीवाल यांची ‘ईडी’च्या समन्सला सातव्यांदा दांडी

माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या अटकेला वर्ष झाल्याप्रकरणी केजरीवाल यांनी आपल्या सर्व मंत्र्यांसह राजघाटाला भेट दिली.

Swapnil S

नवी दिल्ली : कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ‘ईडी’ने सातव्यांदा समन्स जारी केले होते. त्यांना सोमवारी चौकशीसाठी बोलवले होते. मात्र त्यांनी सातव्यांदा ‘ईडी’ चौकशीला दांडी मारली आहे.

माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या अटकेला वर्ष झाल्याप्रकरणी केजरीवाल यांनी आपल्या सर्व मंत्र्यांसह राजघाटाला भेट दिली. मला पाठवलेले ‘ईडी’चे समन्स हे ‘इंडिया’ आघाडीवर दबावासाठी वापरले जात आहे. आम्ही ‘काँग्रेस’सोबतची आघाडी मोडणार नाही, असे ‘आप’ने सांगितले. ‘आप’ने काँग्रेससोबत दिल्ली, हरियाणा व गुजरातमध्ये जागा वाटप केले आहे. केजरीवाल यांनी समन्सला दांडी मारल्याप्रकरणी ‘ईडी’ने सत्र न्यायालयात धाव घेतली.

दरम्यान, केजरीवाल व त्यांच्या पक्षाने ‘ईडी’चे समन्स अवैध असल्याचा आरोप केला. आमची आघाडी तोडण्याचा त्यांचा डाव आहे. त्यांनी अनेकवेळा आम्हाला वेगवेगळ्या प्रकारे इशारे दिले आहेत.

'मुरासू' चक्रीवादळाचा धोका वाढला; चेन्नईत शाळा-कॉलेजला सुट्टी; आंध्रला रेड अलर्ट, महाराष्ट्रातही पावसाचा इशारा

Mumbai : 'अमेरिकेत जाऊन आंदोलन करा'; इम्रान खानला हायकोर्टाने फटकारलं, भारत सोडण्याच्या नोटिशीवर मात्र स्थगिती

पोलीस ठाण्यातच महिलेवर बलात्काराचा आरोप; ३ पोलीस कर्मचारी अटकेत, १५ जण निलंबित; नेमकं काय घडलं?

Mumbai : भांडुपमध्ये लग्नाच्या जेवणातून विषबाधा; नवरा-नवरीसह २७ जण आजारी, तुकाराम मुंढेंनी चौकशी करण्याची मागणी

Thane : येऊरमध्ये ‘हॅलोविन पार्टी’वर पोलिसांची धाड; ७० हून अधिक तरुण-तरुणी उपस्थित, मद्यपान आणि प्रतिबंधित ई-सिगारेटचा वापर