राष्ट्रीय

केरळचे नामांतर ‘केरळम’ होणार

केरळ राज्याचे नामांतर आता ‘केरळम’ होणार आहे. केरळ विधानसभेने याबाबत प्रस्ताव सर्वसहमतीने मंजूर केला आहे.

Swapnil S

थिरूअनंतपुरम : केरळ राज्याचे नामांतर आता ‘केरळम’ होणार आहे. केरळ विधानसभेने याबाबत प्रस्ताव सर्वसहमतीने मंजूर केला आहे. गेल्यावर्षीही केरळ विधानसभेने हा प्रस्ताव मंजूर केला होता. त्यात सुधारणा करून हा प्रस्ताव पुन्हा केंद्र सरकारला पाठवला आहे.

मुख्यमंत्री पी. विजयन यांनी केलेल्या प्रस्तावानुसार, राज्यघटनेच्या पहिल्या सूचीत राज्याचे नाव अधिकृतपणे बदलून ‘केरळम’ करण्यासाठी राज्यघटनेच्या कलम ३ नुसार आवश्यक ती पावले उचलावीत. आययूएमएलचे आमदार एन. शमसुद्दीन यांनी प्रस्तावात सुधारणा करून अधिक स्पष्टता आणण्यासाठी शब्दांमध्ये सुधारणा करण्याचा प्रस्ताव दिला. मात्र, विधानसभेने ही सुधारणा रद्दबातल ठरवली. आपल्या प्रस्तावात मुख्यमंत्री विजयन म्हणाले की, मल्याळममध्ये ‘केरळम’ हे नाव सहजपणे वापरले जाते. सध्या अधिकृतपणे राज्याला ‘केरळ’ हे संबोधले जाते.

मविआचा महानिक्काल, महायुतीच लाडकी; महायुतीला २३६ जागा, तर मविआला केवळ ४९ जागा

‘लाडकी बहीण’ योजना ठरली गेमचेंजर; देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार

झारखंडमध्ये ‘जेएमएम’च्या नेतृत्वाखालील सरकार; इंडिया आघाडीकडे बहुमत, भाजप दुसऱ्या क्रमांकावर

‘सिंह’ म्हातारा झालाय!

‘बटेंगे तो कटेंगे’, ओबीसीने भाजपला तारले