खर्गे आधी मोदींना म्हणाले दहशतवादी, नंतर केला खुलासा; अण्णा द्रमुक-भाजपच्या युतीवर टीका करताना केले होते वादग्रस्त विधान संग्रहित छायाचित्र
राष्ट्रीय

खर्गे आधी मोदींना म्हणाले दहशतवादी, नंतर केला खुलासा; अण्णा द्रमुक-भाजपच्या युतीवर टीका करताना केले होते वादग्रस्त विधान

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत आक्षेपार्ह आणि वादग्रस्त विधान केले.

Swapnil S

चेन्नई : काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत आक्षेपार्ह आणि वादग्रस्त विधान केले. मोदी दहशतवादी असल्याचे म्हणाल्याने सर्व स्तरांतून त्यांच्यावर टीका होऊ लागल्यानंतर आपल्या वक्तव्यावर खर्गेनी स्पष्टीकरणही दिले आहे.

अण्णा द्रमुक भाजपच्या युतीवर टीका करताना त्यांनी हे वादग्रस्त विधान केले होते. चेन्नईत पत्रकारांशी बोलताना खर्गे यांनी अण्णा द्रमुकच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले, 'जे लोक अण्णादुराईंचा फोटो लावतात, ते मोदींसोबत कसे जाऊ शकतात ? ते (मोदी) एक दहशतवादी आहेत. त्यांचा पक्ष समता आणि न्यायावर विश्वास ठेवत नाही. अशा लोकांसोबत जाणे म्हणजे लोकशाही कमकुवत करणे आहे'. तथापि, मी त्यांना स्पष्टपणे 'दहशतवादी' असे कधीच संबोधले नव्हते; मला म्हणायचे होते की, मोदी सतत धमक्या देत असतात."

ते पुढे म्हणाले, 'तामिळनाडूला अशा नेत्यांची गरज आहे जे भाजपासमोर झुकणार नाहीत आणि खंबीरपणे उभे राहतील, जसे एम.के. स्टॅलिन आहेत. आज अण्णा द्रमुकने आपली ओळख गमावली असून तो भाजपचा 'मूक गुलाम' भागीदार बनला आहे'.

खर्गे यांचे स्पष्टीकरण

वादानंतर खर्गे यांनी आपल्या विधानावर स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले की, मला पंतप्रधानांना थेट 'दहशतवादी' म्हणायचे नव्हते, तर ते लोकांना आणि राजकीय पक्षांना 'धमकावतात', असे आपल्याला सुचवायचे होते. 'मी त्यांना दहशतवादी म्हटलेले नाही. मला हे स्पष्ट करायचे आहे की मोदी नेहमी धमकावण्याचे राजकारण करतात. ईडी, आयटी आणि सीबीआय सारख्या संस्था त्यांच्या हातात आहेत', असे खरगे म्हणाले.

मोदींवर आचारसंहिता भंगाचा आरोप

खर्गे यांनी पंतप्रधान मोदींवर आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोपही केला. संसद भवनमध्ये 'संविधान (१३१ वी दुरुस्ती) विधेयक, २०२६' मंजूर होऊ शकले नाही, तरीही पंतप्रधानांनी देशाला संबोधित केले, जे चुकीचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच निवडणूक आयोग भाजपच्या विस्ताराप्रमाणे काम करत असल्याची टीकाही त्यांनी केली. महिला आरक्षण विधेयकाबाबत बोलताना खरगे म्हणाले की, 'मोदी खोटा प्रचार करत आहेत. आम्ही महिला आरक्षण विधेयकाला २०२३ मध्येच पाठिंबा दिला होता आणि तेव्हा त्यांनी आमचे आभारही मानले होते. आमची मागणी फक्त इतकीच होती की, जनगणनेची वाट न पाहता याची अंमलबजावणी त्वरित व्हावी'.

'ऑपरेशन सिंदूर'मधील शहीद अग्निवीराला पूर्ण लाभ नाकारला; आईची हायकोर्टात धाव, भूमिका स्पष्ट करण्याचे केंद्राला आदेश

अमेरिकेकडून भारताला १ लाख कोटींचा परतावा; निर्यातदारांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता

पंतप्रधानांविरुद्ध काँग्रेसची विशेष हक्कभंगाची नोटीस; लोकसभा अध्यक्षांना लिहिले पत्र, खासदारांच्या मतांवर टिप्पणी करणे नियमाविरुद्ध

Palghar Tragedy : वाडा येथील फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट; दोघांचा मृत्यू, ४ जखमी

Mumbai : मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल आल्या आमनेसामने; लोकलसेवा विस्कळीत