राष्ट्रीय

Kolkata Law College Rape Case : महाविद्यालयाच्या सुरक्षा रक्षकाला अटक

कोलकाता विधि महाविद्यालयात प्रथम वर्षाच्या विद्यार्थिनीवर करण्यात आलेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणी पोलिसांनी शनिवारी महाविद्यालयाच्या सुरक्षा रक्षकाला अटक केली. सुरक्षा रक्षकाच्या कक्षात या विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. सुरक्षा रक्षकाल अटक करण्यात आल्याने या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींची संख्या आता चार झाली आहे.

Swapnil S

कोलकाता : कोलकाता विधि महाविद्यालयात प्रथम वर्षाच्या विद्यार्थिनीवर करण्यात आलेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणी पोलिसांनी शनिवारी महाविद्यालयाच्या सुरक्षा रक्षकाला अटक केली. सुरक्षा रक्षकाच्या कक्षात या विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. सुरक्षा रक्षकाला अटक करण्यात आल्याने या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींची संख्या आता चार झाली आहे.

या सुरक्षा रक्षकाला प्रथम चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले होते, मात्र त्याच्या उत्तरांमध्ये विसंगती आढळल्याने शनिवारी सकाळी त्याला अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. प्राथमिक तपासात असे दिसून आले की, सामूहिक बलात्काराच्या वेळी सुरक्षा रक्षक पिनाकी बॅनर्जी हा घटनास्थळी उपस्थित होता. तसेच आरोपीच्या सूचनेनुसार तो संबंधित तरुणीला त्या ठिकाणी सोडून त्याच्या खोलीमधून (गार्ड रूम) निघून गेला. तेव्हा ती तरुणी मदतीसाठी वारंवार विनंती करत होती, पण तरीही संबंधित सुरक्षा रक्षकाने तिला मदत केली नसल्याचे तपासात समोर आले आणि त्यानंतर पोलिसांनी त्यालाही अटक केली असे एका वृत्तात म्हटले आहे. दरम्यान, संबंधित घटनेची माहिती सुरक्षा रक्षकाने महाविद्यालयीन प्रशासनाला किंवा पोलिसांना देणे अपेक्षित होते. मात्र, सुरक्षा रक्षकाने यापैकी काहीही केले नाही. संबंधित घटनेची माहिती कोणालाही दिली नाही. त्यानंतर पीडितेने पोलिसांत तक्रार दिल्यानंतरच हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करत कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी सुरक्षारक्षकाचीही चौकशी केली असता चौकशीत सुरक्षारक्षकाचा निष्काळजीपणा समोर आला आहे.

पीडितेने तक्रारीत म्हटले आहे की, मोनोजित मिश्रा याने मला लग्नाचा प्रस्ताव दिला होता. मात्र, त्याचा प्रस्ताव मी नाकारल्यानंतर सामूहिक बलात्कार करण्यात आला. आरोपी मिश्रा हा याच कॉलेजमधला माजी विद्यार्थी आणि तृणमूल काँग्रेस विद्यार्थी संघटनेचा पदाधिकारी आहे.

विरार-अलिबाग अंतर दोन तासांत पार होणार; मल्टिमॉडेल मार्गिकेला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी

मराठा आंदोलनाचा विजय! अखेर मनोज जरांगे-पाटलांनी पाचव्या दिवशी उपोषण सोडले; राज्य सरकारकडून ८ पैकी ६ मागण्या मान्य

घटनेतील तरतुदींचे स्पष्टीकरण करणार, सर्वोच्च न्यायालयाची माहिती; राष्ट्रपती, राज्यपालांवर विधेयकावर कालावधीचे बंधन

चीनकडून भव्य लष्करी संचलनात अत्याधुनिक शस्त्रांचे आज प्रदर्शन

GST परिषदेची आज बैठक; दैनंदिन वापरातील वस्तूंवरील कर कमी होण्याची शक्यता