ANI
राष्ट्रीय

Kolkata Woman Doctor Rape-Murder: सुप्रीम कोर्टाचे आदेश डॉक्टरांनी बसवले धाब्यावर

कोलकाताच्या आर. जी. कर वैद्यकीय महाविद्यालयात संपकरी डॉक्टरनी सुप्रीम कोर्टाने दिलेला आदेश धाब्यावर बसवला आहे.

Swapnil S

कोलकाता : कोलकाताच्या आर. जी. कर वैद्यकीय महाविद्यालयात संपकरी डॉक्टरनी सुप्रीम कोर्टाने दिलेला आदेश धाब्यावर बसवला आहे. आमच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असे संपकरी डॉक्टरांनी सांगितले.

सुप्रीम कोर्टाने या डॉक्टरना मंगळवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत ड्युटीवर हजर राहण्याचे आदेश दिले होते. परंतु या डॉक्टरांनी कामावर हजर होण्यास नकार दिला. तसेच या संपकरी डॉक्टरनी राज्य सरकारशी चर्चा करण्यास नकार दिला. प. बंगाल सरकार व मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी संपकरी डॉक्टरांची सायंकाळी ५ वाजेपर्यंत वाट पाहिली. त्यानंतर सायंकाळी ६ वाजता संपकरी डॉक्टरांशी चर्चा करायला त्यांना ‘ईमेल’ पाठवला. तरीही डॉक्टरांनी राज्य सरकारचा आदेश मानला नाही.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी