राजस्थानमधील कोटा येथे खासगी बसचा भीषण अपघात; ३ प्रवाशांचा मृत्यू, २० जखमी 
राष्ट्रीय

राजस्थानमधील कोटा येथे खासगी बसचा भीषण अपघात; ३ प्रवाशांचा मृत्यू, २० जखमी

अहमदाबादहून मध्य प्रदेशकडे जाणाऱ्या एका खासगी ट्रॅव्हल्स बसला राजस्थानमधील कोटा येथे भीषण अपघात झाला.

Swapnil S

कोटा : अहमदाबादहून मध्य प्रदेशकडे जाणाऱ्या एका खासगी ट्रॅव्हल्स बसला राजस्थानमधील कोटा येथे भीषण अपघात झाला. रस्ते दुभाजकाला धडकून बस उलटल्याने तीन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला असून सुमारे २० प्रवासी जखमी झाले आहेत. गुरुवारी पहाटे ही दुर्घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, बस दुभाजकाला धडकून उलटली तेव्हा समोरील काच फुटली. यामुळे केबिनमध्ये बसलेले तीन प्रवासी बाहेर फेकले गेले. त्याचवेळी मागून येणाऱ्या एका भरधाव ट्रकने त्यांना चिरडले, ज्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला.

बचावकार्य आणि मदत

अपघाताची माहिती मिळताच कोटा शहराच्या पोलीस अधीक्षक तेजस्विनी गौतम, अग्निशमन अधिकारी राकेश व्यास आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. आर. के. पुरम पोलीस स्टेशनच्या हद्दीतील नयागाव ओव्हरब्रिजजवळ हा अपघात झाला. बस उलटल्याने अनेक प्रवासी आत अडकून पडले होते. सुमारे दोन तास चाललेल्या अथक प्रयत्नांनंतर पहाटे २:३० च्या सुमारास सर्व प्रवाशांना बाहेर काढण्यात यश आले.

राजस्थानमधील कोटा येथे खासगी बसचा भीषण अपघात; ३ प्रवाशांचा मृत्यू, २० जखमी

अपघाताचे कारण

अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, प्राथमिक तपासानुसार, रस्त्यावर अचानक जनावरे आडवी आल्याने चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले असावे, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. या बसमधील बहुतांश प्रवासी मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर आणि भिंड येथील रहिवासी असल्याचे समजते. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Mumbai : पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमापूर्वी खळबळ; बनावट PMO अधिकाऱ्यासह बंदुकधारी बॉडीगार्डला अटक, सुरक्षा यंत्रणा सतर्क

हिंदू धार्मिक गटाच्या भेटीदरम्यान वाद; महिला कर्मचाऱ्यांना हटवलं, 'आयफेल टॉवर' बंद, नेमकं काय घडलं?

तिसऱ्या मजल्यापर्यंत पाठलाग; दिल्लीत बेदम मारहाण करत मणिपुरी संगीतकाराची हत्या, CCTV व्हिडीओ समोर

उच्च न्यायालयाचा स्टेट बँकेला दणका; मूळ कागदपत्रे परत करणे बँकेचीच कायदेशीर जबाबदारी

मेट्रो-५ च्या चाचणीची तयारी अंतिम टप्प्यात; ठाणे-भिवंडी मेट्रो मार्गावर २५ हजार व्होल्टचा वीजप्रवाह सुरू