फोटो - सोशल मीडिया
राष्ट्रीय

४० हजार रुपयांसाठी देशाशी गद्दारी; पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्याला ATS ने कच्छमधून अटक

गुजरातमधील कच्छ जिल्ह्यातील सीमावर्ती भागातून एटीएसने पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या एका व्यक्तीला अटक केली आहे.

Swapnil S

अहमदाबाद : गुजरातमधील कच्छ जिल्ह्यातील सीमावर्ती भागातून एटीएसने पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या एका व्यक्तीला अटक केली आहे. अटक केलेल्या व्यक्तीचे नाव सहदेव सिंह गोहिल असे आहे. सहदेव आरोग्य कर्मचारी असून एटीएसने दिलेल्या माहितीनुसार, त्याने भारतीय सीमा, बीएसएफ आणि भारतीय नौदलाच्या कारवाया, परिसराचे फोटो आणि इतर संवेदनशील माहिती पाकिस्तानला पाठवली होती. त्याने गुजरातच्या अनेक सीमावर्ती भागांची माहितीही दिली होती होती.

चौकशीदरम्यान सहदेव सिंह जून-जुलै २०२३ पासून 'अदिती भारद्वाज' नावाच्या पाकिस्तानी एजंटच्या संपर्कात असल्याचे समोर आले आहे. दोघांमध्ये व्हॉट्सअॅपवर संभाषण सुरू होते. जानेवारी २०२५ मध्ये सहदेव सिंहने त्याच्या आधार कार्डचा वापर करून एक भारतीय सिम कार्ड मिळवले आणि फेब्रुवारी २०२५ मध्ये त्याने ते सिम कार्ड ओटीपीद्वारे अदिती भारद्वाजला दिले, ज्याद्वारे व्हॉट्सअॅप कॉलिंग आणि मेसेजिंग सुरू झाले होते.

हेरगिरीच्या बदल्यात ४०,००० रुपये

हेरगिरीच्या बदल्यात सहदेव सिंहला ४०,००० रुपयांपर्यंतची रक्कम मिळाली होती. तो पाकिस्तानसाठी कंत्राटी पद्धतीने काम करत होता. त्याचा फोन फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीमध्ये पाठवण्यात आला आहे, जिथे त्याचे चॅटिंग, लोकेशन आणि मीडिया ट्रान्सफरचे विश्लेषण केलं जाईल, अशी माहिती मिळत आहे.

हेरगिरी नेटवर्कमध्ये आणखी लोकांचा सहभाग

गुजरात एटीएस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहे. या हेरगिरी नेटवर्कमध्ये आणखी लोकांचा सहभाग असण्याची शक्यता आहे. सुरक्षा एजन्सी आता कॉल डिटेल्स, आर्थिक व्यवहार आणि डिजिटल उपकरणांची चौकशी करत आहेत.

मुंबईसह राज्यातील कबुतरखाने बंद होणार; उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती

बाळ चोरीला गेल्यास रुग्णालयाची नोंदणी रद्द होणार; राज्य सरकारचा निर्णय

आता २४ तास वाळू वाहतूक; GPS, CCTV बसवणे बंधनकारक; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सभागृहात घोषणा

सरकारी यंत्रणा शेतकऱ्यांची मारेकरी! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राहुल गांधी आक्रमक

घरांच्या किमती वाढल्याची राज्य सरकारची कबुली