हिल कौन्सिलना ५ कोटींचे आर्थिक अधिकार; लडाखचे नायब राज्यपाल विनय कुमार सक्सेना यांची प्रस्तावाला मंजुरी संग्रहित छायाचित्र
राष्ट्रीय

हिल कौन्सिलना ५ कोटींचे आर्थिक अधिकार; लडाखचे नायब राज्यपाल विनय कुमार सक्सेना यांची प्रस्तावाला मंजुरी

लडाखचे नायब राज्यपाल विनय कुमार सक्सेना यांनी लडाखमधील प्रत्येक स्वायत्त पर्वतीय विकास परिषदेला (हिल कौन्सिल) ५ कोटी रुपयांपर्यंतच्या विकास प्रकल्पांचे मूल्यांकन आणि मंजुरी देण्याचे आर्थिक अधिकार देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देऊन तो केंद्रीय गृह मंत्रालयाकडे पाठवला आहे.

Swapnil S

लेह/जम्मू : लडाखचे नायब राज्यपाल विनय कुमार सक्सेना यांनी लडाखमधील प्रत्येक स्वायत्त पर्वतीय विकास परिषदेला (हिल कौन्सिल) ५ कोटी रुपयांपर्यंतच्या विकास प्रकल्पांचे मूल्यांकन आणि मंजुरी देण्याचे आर्थिक अधिकार देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देऊन तो केंद्रीय गृह मंत्रालयाकडे पाठवला आहे.

केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अंतिम मंजुरीनंतर हा प्रस्ताव लागू होईल. त्यामुळे निवडून आलेल्या हिल कौन्सिलना त्यांच्या कार्यक्षेत्रातील सार्वजनिक निधीतून राबविण्यात येणाऱ्या योजना आणि विकास प्रकल्पांबाबत निर्णय घेता येणार असून, मंजुरी प्रक्रियेतील विलंब कमी होऊन विकासकामांना गती मिळेल.

स्वतंत्रपणे मंजुरी

सध्या हिल कौन्सिल विकास प्रकल्प तयार करून शिफारस करू शकतात; मात्र त्यांचे मूल्यांकन आणि मंजुरी नायब राज्यपालांकडून केली जाते. प्रस्तावित व्यवस्थेनुसार, ५ कोटी रुपयांच्या मर्यादेत असलेल्या प्रकल्पांना कौन्सिल स्वतंत्रपणे मंजुरी देऊ शकतील. त्यापेक्षा अधिक खर्चाच्या प्रकल्पांना नायब राज्यपालांची मंजुरी आवश्यक असेल.

भारही वाढणार

लडाखमधील हिल कौन्सिलची संख्या दोनवरून आठ जिल्ह्यांपर्यंत वाढल्याने विकास प्रस्तावांचा भारही वाढणार आहे. या प्रस्तावानुसार संबंधित कौन्सिलचे जिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी आर्थिक अधिकारांचा वापर करतील. त्यामुळे लडाखमध्ये विकेंद्रीकरण आणि स्थानिक स्वायत्ततेला चालना मिळणार आहे.

(संबधित इंग्रजी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

प्रत्येक फ्लॅटसाठी प्रॉपर्टी कार्ड; राज्यातील सात कोटी फ्लॅटधारकांना मिळणार दिलासा, राज्य सरकारचा प्रस्ताव

हाय फॅट, साखर, मिठाची स्वतंत्र इशारा चिन्हे अनिवार्य; पाकीटबंद खाद्यपदार्थांबाबत सुप्रीम कार्टाचा आदेश

वॉशिंग सेंटर : पाणी वापरावर बंदी; पिण्याचे पाणी न वापरण्याबाबत राज्य सरकारचा प्रस्ताव, गृहनिर्माण सोसायट्यांवरही निर्बंधांची शक्यता

कॉफी डे एंटरप्रायझेसच्या व्यवहारांची चौकशी होणार; निधी वळवल्याप्रकरणी फॉरेन्सिक ऑडिटर नियुक्त

Navi Mumbai : तुर्भे रेल्वे उड्डाणपूल चार महिने वाहतुकीसाठी बंद; ३१ मार्चपर्यंत वाहनांसाठी स्वतंत्र मार्ग