PM
राष्ट्रीय

संसद घुसखोरीमागील मास्टरमाइंड ललित झा शरण

ललित झा हा गुरुवारी राजस्थानमध्ये पळून गेल्याची चर्चा करण्यात येत होती. मात्र त्यानंतर तो दिल्ली पोलिसांपुढे शरण आला आहे

Swapnil S

नवी दिल्ली : संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू असताना काही तरुणांनी संसदेत घुसखोरी करून सदनात स्मोक बॉम्बचा धूर केला होता. याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. या घटनेचा मास्टरमाइंड ललित झा याला पकडण्यासाठी शोधमोहीम सुरू होती. मात्र मास्टरमाइंड ललित झा याने दिल्ली पोलिसांपुढे शरणागती पत्करली आहे. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली.

ललित झा हा गुरुवारी राजस्थानमध्ये पळून गेल्याची चर्चा करण्यात येत होती. मात्र त्यानंतर तो दिल्ली पोलिसांपुढे शरण आला आहे. ललित झा संसद हल्ला प्रकरणातील मास्टरमाइंड असल्याचा दिल्ली पोलिसांचा आरोप आहे. दिल्ली संसद हल्ल्यातील मास्टरमाइंड असल्याचा आरोपी ललित झा हा राजस्थानमधील नागौर येथे पळून गेला होता. तेथे तो त्याच्या दोन साथीदारांना भेटला. त्यानंतर त्यांनी एका हॉटेलमध्ये मुक्काम ठोकला. मात्र पोलीस आपल्या शोधात असल्याची जाणीव त्याला झाली. त्यामुळे त्याने बस पकडून दिल्लीतील दत्तपेठ पोलीस ठाण्यात धाव घेत आत्मसमर्पण केल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी वृत्तसंस्थेला दिली.

आरोपीला सात दिवसांची कोठडी

संसदेवर हल्ला केल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे. या चारही आरोपींवर यूएपीए कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने या चारही आरोपींना दिल्लीतील पटियाला हाऊस न्यायालयात गुरुवारी हजर केले. या चारही आरोपींना पटियाला हाऊस न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश डॉ. हरदीप कौर यांनी गुरुवारी मनोरंजन डी, सागर शर्मा, अमोल धनराज शिंदे आणि नीलम देवी या चारही आरोपींना सात दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे.

मुंबईतून डबे, लखनऊतून विशेष शूज खरेदी केले होते. मनोरंजन डी., सागर शर्मा, अमोल धनराज शिंदे आणि नीलम देवी या चारही आरोपींनी हा कट अंमलात आणला होता. त्यासाठी त्यांनी लखनऊतून विशेष शूज खरेदी केले होते, असा दिल्ली पोलिसांचा आरोप आहे. तर मुंबईतून डबे खरेदी केल्याचाही दिल्ली पोलिसांचा त्यांच्यावर आरोप आहे. त्यामुळे या आरोपींना चौकशीसाठी मुंबई आणि लखनऊला नेण्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

BMC Election : मुंबईत अजितदादांचा स्वबळाचा नारा; ३७ उमेदवारांची पहिली यादी जाहीर, नवाब मलिक यांच्या कुटुंबातील तिघांना उमेदवारी

BMC Election : मुंबईत काँग्रेसची वंचितशी 'हात'मिळवणी; काँग्रेस १५०, तर वंचित आघाडी ६२ जागा लढवणार

स्त्री मुक्ती आणि शिक्षण

उमेदवार खरेदी-विक्री संघ

आजचे राशिभविष्य, २९ डिसेंबर २०२५ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत