राष्ट्रीय

तेलसाठ्याची जागा भाड्याने देणार; युद्ध किंवा आणीबाणीतील काळासाठीच्या साठ्याबाबत निर्णय

सरकारने २०२३-२४ च्या अर्थसंकल्पात तेलसाठ्यातील जागा भरण्यासाठी ५ हजार कोटींची तरतूद केली होती.

Swapnil S

बेतूल (गोवा) : देशाला आणीबाणीच्या काळात तेलाची गरज लागल्यास धोरणात्मक (स्ट्रॅटेजिक) तेलसाठ्याची जागा तेल साठवणुकीसाठी देशी व परदेशी कंपन्यांना भाड्याने देण्याचे घाटत आहे, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. इंडिया स्ट्रॅटेजिक पेट्रोलियम रिझर्व्ह लिमिटेडने आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम, कर्नाटकातील मंगळुरू व पदूर येथे ५.३३ दशलक्ष टन तेलाचा साठा साठवला आहे. युद्ध किंवा आणीबाणीच्या काळासाठी हा साठा साठवला जातो.

संयुक्त अरब अमिरातीच्या अबुधाबी नॅशनल ऑइल कंपनीने पदूर येथील २.५ दशलक्ष टनापैकी अर्धी क्षमता, तर मंगळुरू येथील १.५ दशलक्ष टन क्षमता भाड्याने घेतली आहे. तसेच तर पदूर येथील उर्वरित १.२५ दशलक्ष टन क्षमता आयएसपीआरएलने तर मंगळुरू येथील ०.७५ दशलक्ष टन क्षमता भाड्याने दिली आहे, अशी माहिती आयएसपीआरएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापकीय संचालक एल. आर. जैन यांनी सांगितले.

विशाखापट्टणम येथील १.३३ दशलक्ष टन तेलाची साठवणूक क्षमता आहे. त्यातील ०.३३ दशलक्ष टन क्षमता हिंदुस्थान पेट्रोलियमसाठी बांधली आहे. तसेच एचपीसीएलने आणखी ०.३ दशलक्ष टन जागा भाड्याने घेतली आहे. त्यातील उर्वरित जागा भाड्याने दिली जाणार आहे. तसेच तेलसाठ्याची उर्वरित जागा भाड्याने देण्यासाठी स्वारस्य देकार मागवले जाणार आहेत, असे हा अधिकारी म्हणाला.

सरकारने २०२३-२४ च्या अर्थसंकल्पात तेलसाठ्यातील जागा भरण्यासाठी ५ हजार कोटींची तरतूद केली होती. परंतु वर्षाच्या मध्यापर्यंत ती योजना पुढे ढकलण्यात आली. २०२४-२५ च्या हंगामी अर्थसंकल्पात याबाबतची तरतूदच नाही. जैन म्हणाले की, अबुधाबी नॅशनल ऑइल कंपनी या साठ्यांमध्ये तेल साठवणार आहे. पण, या तेलावर पहिला हक्क भारताचा असेल. आणीबाणीच्या काळात भारत कधीही हे राखीव तेल वापरू शकेल, तर अबुधाबी नॅशनल ऑइल कंपनीसारख्या अन्य कंपन्या या साठ्यातील तेल विकू शकतील. आयएसपीआरएल आणखी ५ दशलक्ष टन अतिरिक्त साठा सरकारी-खासगी तत्त्वावर उभारणार आहे. यासाठी लागणारे भूसंपादन केले आहे, असे त्यांनी सांगितले.

भारत हा जगातील तिसरा तेल आयात करणारा देश आहे. भारताला लागणारे ८५ टक्के तेल आपण आयात करतो. कोणत्याही कारणास्तव तेलाचा पुरवठा विस्कळीत झाल्यास तेलसाठ्यातून पुरवठा केला जातो

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी