संग्रहित छायाचित्र 
राष्ट्रीय

अयोध्येप्रमाणेच गुजरातमध्येही होणार भाजपचा पराभव! काँग्रेस नेते राहुल गांधी यांना विश्वास

Swapnil S

पक्षनेते राहुल गांधी यांनी शनिवारी थेट गुजरातमध्ये जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या गृहराज्यातच भाजपला आव्हान दिले. लोकसभेच्या निवडणुकीत अयोध्येत ज्याप्रमाणे भाजपचा पराभव केला त्याप्रमाणेच काँग्रेस पक्ष पुढील निवडणुकीत गुजरातमध्येच भाजपचा पराभव करेल, असे गांधी म्हणाले.

अहमदाबादमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पक्ष कार्यकर्त्यांच्या एका मेळाव्यात गांधी बोलत होते. भाजपने आम्हाला धाकदपटशा दाखविला आणि आमच्या कार्यालयाची मोडतोड केली. ज्याप्रमाणे त्यांनी आपले कार्यालय तोडले त्याप्रमाणेच आपण एकत्रितपणे त्यांचे सरकार तोडून टाकू, अयोध्येत ज्याप्रमाणे पराभव केला त्याप्रमाणे काँग्रेस गुजरातमध्ये लढून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचा पराभव करेल असे आपण लिहून देतो, असेही विरोधी पक्षनेते म्हणाले.

गुजरातमध्ये काँग्रेस पक्ष विजयी होईल आणि त्याच राज्यातून नवी सुरुवात केली जाईल, असे ते म्हणाले. काँग्रेस आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये राजीव गांधी भवन येथे चकमक उडली त्या संदर्भात ते बोलत होते. गांधी यांनी हिंदूंबाबत केलेल्या विधानाचा निषेध करण्यासाठी भाजपच्या युवक संघटनेचे कार्यकर्ते तेथे जमले होते, तेव्हा २ जुलै रोजी ही चकमक उडाली. या वेळी दोन्ही बाजूंनी एकमेकांवर तुफान दगडफेक करण्यात आली आणि त्यामध्ये एका सहाय्यक पोलीस आयुक्तांसह पाच पोलीस जखमी झाले. राम मंदिराचे उद्घाटन करण्यात आले तेव्हा एकाही स्थानिकाला निमंत्रित करण्यात आले नाही. त्यामुळे अयोध्येतील नागरिक संतप्त झाले. नरेंद्र मोदी यांना अयोध्येतून निवडणूक लढण्याची इच्छा होती, मात्र तुमचा पराभव होऊन राजकीय कारकीर्द संपुष्टात येईल, असा सल्ला मोदी यांना काही जणांनी दिला, असेही राहुल गांधी यांनी सांगितले.

Mumbai : आर्थिक कोंडी फोडण्यासाठी ‘बेस्ट’ आयडिया! आता CNG विकणार; २७ डेपोंत प्रकल्प राबवणार

कोल्हापूर -पुणे 'वंदे भारत' आजपासून; आठवड्यातून ३ दिवस धावणार, बघा वेळापत्रक

‘लालबागचा राजा’च्या दर्शनासाठी भेदभाव; दोन वकिलांची मुंबई पोलिसांकडे तक्रार

नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवठ्यात निवडणुका; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे संकेत, महायुतीचे जागावाटप आठवडाभरात पूर्ण!

गणरायाच्या विसर्जन सोहळ्यासाठी BMC सज्ज; ६९ नैसर्गिक स्थळांसह, २०४ कृत्रिम विसर्जनस्थळांची व्यवस्था