राष्ट्रीय

राज्यसभेसाठी भाजपच्या उमेदवारांची यादी जाहीर

हरयाणा व जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने राज्यसभेच्या निवडणुकीसाठी आपल्या ९ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : हरयाणा व जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने राज्यसभेच्या निवडणुकीसाठी आपल्या ९ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.लोकसभा निवडणूक व दोन सदस्यांनी राजीनामा दिल्यानंतर राज्यसभेतील १२ जागा रिक्त झाल्या आहेत.

आसाम, बिहार व महाराष्ट्रातील प्रत्येकी दोन, हरयाणा, मध्य प्रदेश, राजस्थान, त्रिपुरा, ओदिशा आणि तेलंगणातील प्रत्येकी एक-एक जागा रिक्त आहेत.

या जागांसाठी भाजपने मिशन रंजन दास, रामेश्वर तेली (आसाम), मनन कुमार मिश्र (बिहार), किरण चौधरी (हरयाणा), जॉर्ज कुरियन (मध्य प्रदेश), धैर्यशील पाटील (महाराष्ट्र), ममता मोहंता (ओदिशा), रवनीत सिंह बिट्टू (राजस्थान), राजीब भट्टाचार्य (त्रिपुरा) यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

Maratha Reservation : मनोज जरांगे मराठा आरक्षणासाठी अखेर आझाद मैदानात; बेमुदत आंदोलनावर ठाम, पावसातही आंदोलकांचा उत्साह कायम

लातूर-नांदेडमध्ये मुसळधार पावसाचा कहर; बचावासाठी लष्कराची मदत, जनजीवन विस्कळीत

...तर मुख्यमंत्र्यांच्या कारकीर्दीला धोका! मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा इशारा

दीड दिवसाच्या बाप्पाला निरोप; २९,९६५ गणेशमूर्तीच विसर्जन

...तर भारताचा 'टॅरिफ' कमी करू! व्हाइट हाऊसचे सल्लागार पीटर नवारो यांचे वक्तव्य