राष्ट्रीय

लालकृष्ण अडवाणी रुग्णालयात दाखल

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांना मंगळवारी येथील अपोलो या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांना मंगळवारी येथील अपोलो या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.

लालकृष्ण अडवाणी यांच्यावर डॉ. विनीत सुरी हे उपचार करीत असून नियमित चाचण्या आणि तपासण्या करण्यासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अडवाणी यांना लवकरच म्हणजे बुधवारी रुग्णालयातून घरी पाठविले जाण्याची शक्यता आहे, असे रुग्णालयाच्या वतीने जारी करण्यात आलेल्या एका छोट्या निवेदनामध्ये म्हटले आहे.

Thane : जेवणाच्या जास्त दराबाबत विचारणा महागात; भिवंडीच्या ढाब्यावर तरुणाला मारहाण, Video व्हायरल, पोलिसांनी घेतली दखल

'स्वत:चं मत कुठे गेलं?' ची पोस्ट व्हायरल; जळगावातील महिला उमेदवाराला खरंच शून्य मतं? जाणून घ्या सत्य

Mumbai : मुदतीआधीच बेलासिस उड्डाणपुलाचे काम फत्ते! मुंबई सेंट्रल, नागपाडा आणि ताडदेवमधील वाहतूककोंडी फुटणार

महाराष्ट्रात गुंतवणुकीचा ओघ; MMRDA कडून ९६ अब्ज डॉलरचे गुंतवणूक करार; ९.६ लाख रोजगारांची निर्मिती होणार

भाजप-शिंदेसेनेत रस्सीखेच; महापौरपद किंवा स्थायी समितीसाठी शिंदेसेना आग्रही; मुंबईचा महापौर दिल्लीतून ठरणार