राष्ट्रीय

जागतिक एअरलाइन्स कंपन्यांचा तोटा कमी होणार

२०२३ मध्ये विमान कंपन्या नफ्यात असतील,असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.

वृत्तसंस्था

जागतिक एअरलाइन्सचा तोटा २०२१ मधील ५२ अब्ज डॉलर्सवरून या वर्षी ९.७ अब्ज डॉलर्सने कमी होण्याची अपेक्षा आहे, असे इंटरनॅशनल एअर ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे (आयएटीए) महासंचालक विली वॉल्श यांनी सोमवारी सांगितले. तसेच २०२३ मध्ये विमान कंपन्या नफ्यात असतील, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.

विशेष म्हणजे आयएटीए ही २९० एअरलाइन्स कंपन्यांचे प्रतिनिधित्व करते. या कंपन्यांकडून जागतिक हवाई वाहतूक ८३ टक्के होते. जागतिक स्तरावर, एअरलाइन्सचा दृष्टीकोन सकारात्मक दिसत आहे, परंतु अद्यापही व्यवसायापुढे अनेक आव्हाने आहेत, असे वॉल्श यांनी आयएटीएच्या ७८व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत उद्घाटनपर भाषणात सांगितले. अशा सर्व आव्हानांचा पाढा वाचताना ते म्हणाले की, ऑर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिक को-ऑपरेशन अँड डेव्हलपमेंट (OECD), ३८ विकसित देशांचा समूह असून, एप्रिलमध्ये महागाईचा दर नऊ टक्क्यांच्या वर आहे.

वॉल्श म्हणाले की, जागतिक जीडीपी या वर्षी ३.४ टक्के वाढेल, अशी आमची अपेक्षा आहे. जरी तो आधी वर्तविलेल्या अंदाजापेक्षा जास्त नसला तरी तो खूप कमीही नाही. आपल्या भाषणात त्यांनी जागतिक बँकेचा हवाला देत सांगितले की, २०२१च्या तुलनेत यावर्षी ऊर्जेच्या किमती ५० टक्क्यांनी वाढतील, अशी अपेक्षा आहे. त्याच वेळी, त्यांनी रशिया-युक्रेन युद्धाचा संदर्भ देत म्हटले की, रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यामुळे जागतिकीकरण अस्थिर झाले आहे, जे जगाच्या अन्न पुरवठ्यासाठी धोकादायक आहे.

वॉल्श पुढे म्हणाले की, ६५० अब्ज डॉलर्स कर्ज असलेल्या एअरलाइन्सच्या बिघडलेला ताळेबंद उत्तम करण्याचे मोठे आव्हान आहे. आमचा उद्योग आता कठीण काळातून जाणारा असला तरी उत्साहही दिसून येत आहे. आमचे नवीन विश्लेषण २०२१ मध्ये जवळपास ४२ अब्ज डॉलर्सची नुकसान दाखवते. म्हणजेच या वर्षी जागतिक तूट ९.७ अब्ज डॉलर्स इतकी कमी होईल.

Maratha Reservation : सलग तिसऱ्या दिवशी वाहतूक विस्कळीत; CSMT परिसरात आंदोलकांचे बस्तान

Maratha Reservation: आंदोलनाची धग वाढणार; मनोज जरांगे आजपासून पाणी पिणेही बंद करणार; एकतर विजययात्रा, नाहीतर अंत्ययात्रा

Maratha Reservation : दक्षिण मुंबईत आज पुन्हा कोंडीची शक्यता

Maratha Reservation : CSMT परिसरात अस्वच्छता; राज्यभरातून अन्नपदार्थांचा ओघ वाढल्याने नासाडी

Maratha reservation protest : सुप्रिया सुळेंना आंदोलकांचा घेराव; गाडीवर बाटल्या भिरकावल्या