राष्ट्रीय

ऑनलाइन गेमच्या नादात ३६ लाख रुपये गमावले

वृत्तसंस्था

एका १६ वर्षीय मुलाने मोबाइल फोनवर ऑनलाइन गेमच्या नादात आईच्या बँक अकाउंटमधील ३६ लाख रुपये गमावले आहेत. ही घटना हैदराबाद येथे घडली आहे.

सध्या मुलांमध्ये ऑनलाइन गेमचा विळखा वाढत चालला आहे. ऑनलाइन गेम खेळल्यामुळे आर्थिक नुकसान झाल्यानंतर अनेक व्यक्तींनी आत्महत्या केल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. हैदराबादमधील अंबरपेट भागात राहणाऱ्या या मुलाने ऑनलाइन गेमचे पैसे भरण्यासाठी आपल्या आईच्या बँक खात्याचा वापर केला.

हैदराबाद पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेनुसार, मुलाने आपल्या आजोबांच्या मोबाइल फोनवर एक ‘फ्री फायर गेमिंग अॅप’ डाउनलोड केले होते. गेम खेळण्यासाठी सुरुवातील १५०० रुपये आणि नंतर बँक खात्यातून १० हजार रुपये लागणार होते. त्याला खेळाचे व्यसन लागल्यानंतर तो कुटुंबाला न सांगता यासाठी पैसे खर्च करू लागला.

मृत पोलीस अधिकाऱ्यांचा अकरावीत शिकणारा हा मुलगा १.४५ लाख रुपयांपासून दोन लाखांपर्यंत पैसे भरत होता. जेव्हा त्याची आई पैसे काढण्यासाठी बँकेत गेली, तेव्हा खात्यावर पैसेच नसल्याचे कळाले. हे ऐकताच त्यांना धक्का बसला. खात्यातून एकूण २७ लाख रुपये खर्च करण्यात आले होते. यानंतर तिने एचडीएफसी बँकेतून खात्याचा तपास केला तर त्यातूनही नऊ लाख रुपये गायब झाले होते. या महिलेने सायबर क्राइमकडे याबाबत तक्रार केली.

Maharastra Rain: मुसळधार पावसाची शक्यता; ऑरेंज अलर्ट जारी

शाहरुख खान लेकामुळे पुन्हा अडचणीत! समीर वानखेडेंची न्यायालयात धाव, २ कोटींचा मानहानीचा दावा

मराठवाडा पूरग्रस्तांसाठी लालबागचा राजा मंडळाची मदत; पारलिंगी समुदायाने मागितला जोगवा, राज्यातील शिक्षकांचाही पुढाकार

लडाख आंदोलनाला हिंसक वळण; भाजपचा कॉँग्रेसवर कटाचा आरोप

पुन्हा उभं राहण्याची आशा संपली! धाराशिवमध्ये शेतकऱ्याची आत्महत्या; अतिवृष्टीने शेत गेलं वाहून