ANI
राष्ट्रीय

LPG Cylinder Price Update : व्यावसायिक सिलिंडर धारकांसाठी मोठी बातमी

देशातील महागाईने त्रस्त असलेल्या जनतेला या महिन्याच्या पहिल्याच दिवशी मोठा दिलासा

वृत्तसंस्था

देशातील महागाईने त्रस्त असलेल्या जनतेला या महिन्याच्या पहिल्याच दिवशी मोठा दिलासा मिळाला आहे. 1 सप्टेंबरपासून 19 किलो एलपीजी सिलिंडरची किंमत 100 रुपयांनी कमी झाली आहे. तथापि, ही दरकपात केवळ व्यावसायिक सिलिंडरवर आहे, 14.2 किलोचे घरगुती एलपीजी सिलिंडर जुन्या किमतीत उपलब्ध असेल.

आजपासून किलोचा व्यावसायिक सिलिंडर दिल्लीत 91.50 रुपयांनी, कोलकात्यात 100 रुपयांनी, मुंबईत 91.50 रुपयांनी आणि चेन्नईमध्ये 96 रुपयांनी स्वस्त होणार आहे.

व्यावसायिक सिलिंडरच्या नवीन किमती

नवीन दरांनुसार, 19 किलोचा हा एलपीजी सिलिंडर आता दिल्लीत 1885 रुपये, कोलकात्यात 1995 रुपये, मुंबईत 1844 रुपये आणि चेन्नईमध्ये 2045 रुपयांना मिळणार आहे. घरगुती सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल नाही 6 जुलैपासून देशांतर्गत सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही.

लाडक्या बहिणींना ई-केवायसी बंधनकारक; योजनेसाठी पारदर्शकतेला प्राधान्य देणार - अदिती तटकरे

मल्याळम सुपरस्टार मोहनलाल यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर; ४०० हून अधिक चित्रपटांत उमटवला अभिनयाचा ठसा!

Latur : लातूरमध्ये पावसाचा कहर; ४० तासांनंतर सापडले ५ जणांचे मृतदेह

पुणे-नाशिक महामार्गावर गॅस टँकरची गळती; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

मनसेचा आज ट्रॅफिक मार्च; नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन