राष्ट्रीय

पंतप्रधान नरेंद्र मोदी ५ फेब्रुवारीला कुंभस्नान करणार

प्रयागराज येथे महाकुंभ मेळ्याला सुरुवात झाली असून जगभरातून आतापर्यंत एक कोटीपेक्षा जास्त भाविकांनी कुंभस्नान केले आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : प्रयागराज येथे महाकुंभ मेळ्याला सुरुवात झाली असून जगभरातून आतापर्यंत एक कोटीपेक्षा जास्त भाविकांनी कुंभस्नान केले आहे. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ५ फेब्रुवारीला कुंभस्नान करण्यासाठी प्रयागराजला जाणार आहेत. त्यांच्या स्वागताची पूर्वतयारी जवळपास पूर्ण होत आली आहे. त्याच दिवशी दिल्लीत निवडणुकाही होणार आहेत.

नरेंद्र मोंदी कुंभमेळ्यात स्नान करून दिल्ली विधानसभेच्या मतदानासाठी रवाना होतील, असे समजते. मौनी अमावस्या आणि वसंत पंचमीच्या मुहूर्तावर मोदींना शाही स्नान घेता आले असते. मात्र, त्यांनी ५ फेब्रुवारीचाच दिवस निवडला. ५ फेब्रुवारी ही माघ महिन्यातील गुप्त नवरात्रीची अष्टमी तिथी आहे. धार्मिक दृष्टीकोनातून हा दिवस अतिशय शुभ मानला जातो. ज्यामध्ये तपश्चर्या, ध्यान आणि साधना करणे अत्यंत पुण्यकारक मानले जाते. तसेच हा दिवस भीष्माष्टमीचा आहे. महाभारतातील कथेनुसार युद्धात जखमी झालेले भीष्माचार्य सूर्यदेवाच्या उत्तरायण आणि शुक्ल पक्षाची वाट पाहू लागले. जेव्हा माघ महिन्याची अष्टमी हा शुभ दिन आणि शुभ तिथी आली, तेव्हा उत्तरायणात भीष्मांनी भगवान श्रीकृष्णासमोर आपला देह ठेवला आणि प्राणोत्क्रमण केले, त्यामुळे त्यांना मोक्ष प्राप्त झाला.

माघ महिन्यातील अष्टमी तिथीला पवित्र नद्यांमध्ये स्नान करून आपल्या पितरांचे ध्यान करून त्यांच्या नावाने जल, तीळ, अक्षत आणि फळे, फुले अर्पण केल्यास पितरांना देखील मोक्ष प्राप्त होतो, असे शास्त्रात सांगितले आहे. तसेच हा विधी करणाऱ्यांनादेखील मोक्ष प्राप्त होतो. तेव्हापासून माघ महिन्याची अष्टमी तिथी अत्यंत पुण्यपूर्ण आणि फलदायी मानली जाते.

Maratha Reservation : मनोज जरांगे मराठा आरक्षणासाठी अखेर आझाद मैदानात; बेमुदत आंदोलनावर ठाम, पावसातही आंदोलकांचा उत्साह कायम

लातूर-नांदेडमध्ये मुसळधार पावसाचा कहर; बचावासाठी लष्कराची मदत, जनजीवन विस्कळीत

...तर मुख्यमंत्र्यांच्या कारकीर्दीला धोका! मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा इशारा

दीड दिवसाच्या बाप्पाला निरोप; २९,९६५ गणेशमूर्तीच विसर्जन

...तर भारताचा 'टॅरिफ' कमी करू! व्हाइट हाऊसचे सल्लागार पीटर नवारो यांचे वक्तव्य