राष्ट्रीय

Viral Video : महिंद्रा थारचा भररस्त्यात स्कॉर्पिओवर हल्ला, एक-दोनदा नव्हे, तब्बल 'इतक्या' वेळा दिली धडक; भररस्त्यात नेमकं काय घडलं?

व्हायरल व्हिडिओमध्ये महिंद्रा थार चालक भररस्त्यात स्कॉर्पिओला एकपाठोपाठ एक धडक देताना दिसत आहे

Suraj Sakunde

दिल्ली: रोड रेजच्या घटना भारतात दररोज समोर येत असून ही चिंतेची बाब बनली आहे. अशीच एक घटना नुकतीच दिल्लीमध्ये पाहायला मिळाली. महिंद्रा थार आणि स्कॉर्पिओ क्लासिक या दोन एसयूव्हींमध्ये सुरु असलेला संघर्ष पाहून लोकांमध्ये भीतीचं वातावरण तयार झालं होतं.

महिंद्रा थार आणि महिंद्रा स्कॉर्पिओचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये, थार चालक भररस्त्यात स्कॉर्पिओला एकपाठोपाठ एक धडक देताना दिसत आहे. स्कॉर्पिओवाला ड्रायव्हर गाडी घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु थार तिला वारंवार टक्कर देत तसं करून देत नाहीये.

महिंद्रा थार स्कॉर्पिओवर अनेक वेळा आदळल्यानं तिच्या बाजूच्या प्रोफाइलचं मोठं नुकसान झाल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे. अखेर, अनेकदा टक्कर दिल्यानंतर थार चालकानं स्कॉर्पिओला बाजूला केलं आणि घटनास्थळावरून पळ काढला. स्कॉर्पिओ चालक थार चालकाला कोणत्याही प्रकारचा प्रतिकार करत नसल्याचं व्हायरल व्हिडिओमध्ये दिसून येत आहे.

या घटनेमुळे रस्ता सुरक्षा आणि वाहनचालकांच्या वागणुकीबाबतच्या चर्चेला उधाण आले आहे. नेटकऱ्यांनी सार्वजनिक रस्त्यांवर अशा आक्रमक कृतींबद्दल चिंता व्यक्त केली आहे. असं करणं रस्त्यावरून जाणाऱ्या इतर वाहनधारकांसाठीही धोकादायक ठरू शकते, अशी प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्यक्त होत आहे.

या व्हिडिओमध्ये दाखवण्यात आलेल्या या वादामागचं कारण अद्याप समजू शकलेले नाही, मात्र हा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. रस्त्यावर शांतता राखण्याची अत्यावश्यक गरज आहे.

शिवसेना नाव, धनुष्यबाण चिन्ह कोणाचे ? १४ जुलैला सुनावणी

माऊलींच्या पालखीत 'माऊली'चा अपमान; चोपदाराने वारकरी महिलेला दिलं ढकलून| Video

बाजीराव पेशव्यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमावर मस्तानी यांच्या वंशजाचा बहिष्कार

कोकणातील कातळशिल्पांचे जतन करा; मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश

दीपिका पदुकोण 'हॉलिवूड वॉक ऑफ फेम'वर झळकणार; इतिहास रचणारी ठरली पहिली भारतीय अभिनेत्री