गुजराती जनता 'अशिक्षित' असल्याचे वक्तव्य; खर्गेंनी व्यक्त केला खेद, म्हणाले - गुजरातबद्दल सर्वोच्च आदर 
राष्ट्रीय

गुजराती जनता 'अशिक्षित' असल्याचे वक्तव्य; खर्गेंनी व्यक्त केला खेद, म्हणाले - गुजरातबद्दल सर्वोच्च आदर

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी गुजरातच्या जनतेला ‘अशिक्षित’ म्हटल्याबद्दल बुधवारी अधिकृतपणे खेद व्यक्त केला आहे. गुजरातच्या जनतेबद्दल आपल्या मनात नेहमीच सर्वोच्च आदर होता आणि भविष्यातही राहील, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी गुजरातच्या जनतेला ‘अशिक्षित’ म्हटल्याबद्दल बुधवारी अधिकृतपणे खेद व्यक्त केला आहे. गुजरातच्या जनतेबद्दल आपल्या मनात नेहमीच सर्वोच्च आदर होता आणि भविष्यातही राहील, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे.

केरळमधील विधानसभा निवडणुकीच्या पंतप्रधान मोदी आणि विजयन हे गुजरातसारख्या ठिकाणच्या अशिक्षित लोकांना मूर्ख बनवू शकतात, पण केरळमधील सुशिक्षित जनतेला नाही. या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात मोठा गदारोळ निर्माण झाला होता.

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केरळमधील एका निवडणूक सभेत केलेल्या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. दरम्यान या प्रकरणी बुधवारी दिल्लीतील काँग्रेस कार्यालयाबाहेरही गुजराती बांधवांनी जोरदार निदर्शने केली.

भाजपचा पलटवार

खर्गे यांच्या या विधानावरून भारतीय जनता पक्षाने आक्रमक पवित्रा घेतला होता. भाजपने हे वक्तव्य "निर्लज्ज, अपमानजनक आणि तुच्छ" असल्याचे म्हटले होते. माजी केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी पत्रकार परिषदेत काँग्रेसवर हल्लाबोल करत, "राहुल गांधी, सोनिया गांधी आणि प्रियांका गांधी खर्गे यांच्या या विधानाशी सहमत आहेत का, असा सवाल विचारून स्पष्टीकरणाची मागणी केली होती.

खर्गे यांचे स्पष्टीकरण

वादावर पडदा टाकताना खर्गे यांनी एक्सवरपोस्ट करत म्हटले की, केरळमधील निवडणूक भाषणात मी केलेल्या काही विधानांचा जाणीवपूर्वक चुकीचा अर्थ लावला जात आहे. तरीही, मी याबद्दल मनापासून खेद व्यक्त करतो. गुजरातच्या जनतेच्या भावना दुखावण्याचा माझा कोणताही हेतू नव्हता. माझ्या मनात गुजरातबद्दल नेहमीच नितांत आदर आहे.

व्याज दर तूर्त स्थिर; RBI चे 'वेट अँड वॉच' धोरण; GDP ६.९ टक्के, महागाई दर ४.६ टक्के राहण्याचा अंदाज

बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत रंगत वाढली; शेवटच्या दिवशी ६ उमेदवारांची माघार; काँग्रेसचे आकाश मोरे मैदानात ठाम

सरकारी भूखंड ४९ वर्षांसाठी भाड्याने मिळणार; सरकारकडून जुन्या धोरणात सुधारणा

शाळा सोडल्याचा दाखला वयाचा निर्णायक पुरावा नाही; मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय

युद्धविराम पण तात्पुरता; अमेरिका-इराणदरम्यान २ आठवड्यांची शस्त्रसंधी, शुक्रवारी इस्लामाबादमध्ये चर्चेची शक्यता