राष्ट्रीय

आंदोलनकर्त्या डॉक्टरांना धमकी दिल्याचे आरोप ममतांनी फेटाळले; बलात्कार कायद्यात सुधारणेसाठी विधानसभेचे विशेष अधिवेशन

Swapnil S

कोलकाता : महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याच्या निषेधार्थ गेल्या २१ दिवसांपासून काम बंद पुकारणाऱ्या सरकारी रुग्णालयातील कनिष्ठ डॉक्टरांना आपण धमकी दिलेली नाही, असे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी गुरुवारी स्पष्ट केले.

आंदोलनकर्त्या कनिष्ठ डॉक्टरांना आपण धमकी दिल्याचा आरोप काहीजण करीत असून तो धादांत खोटा आहे. असत्य माहिती पसरविण्याच्या प्रयत्नांचा तो एक भाग आहे, असेही ममता यांनी म्हटले आहे. डॉक्टर, विद्यार्थी अथवा त्यांच्या आंदोलनाविरुद्ध आपण चकार शब्दही उच्चारलेला नाही. त्यांच्या आंदोलनाला आपला पूर्ण पाठिंबा आहे, त्यांचे आंदोलन खरे आहे, आपण कधीही त्यांना धमकावलेले नाही, असे ममता यांनी ‘एक्स’वर म्हटले आहे.

ममता यांनी बुधवारी तृणमूल काँग्रेस छात्र परिषदेच्या कार्यक्रमात डॉक्टरांना कामावर रूजू होण्याचे आवाहन केले. संपकरी डॉक्टरांविरुद्ध एफआयआर नोंदविण्याची आपली इच्छा नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले होते. मात्र हीच ममतांची धमकी असल्याचा निष्कर्ष विद्यार्थ्यांनी काढला आणि ममता यांचे आवाहन धुडकावले.

बलात्कार कायद्यात सुधारणेसाठी विधानसभेचे विशेष अधिवेशन

बलात्काऱ्यांना फाशीची शिक्षा देण्यासाठी कायद्यात सुधारणा करणारे विधेयक पश्चिम बंगाल विधानसभेत मांडण्यात येणार असून त्यासाठी राज्य विधानसभेचे दोन दिवसांचे विशेष अधिवेशन २ सप्टेंबर रोजी बोलावण्यात येणार आहे, अशी माहिती संसदीय कामकाज मंत्री सोवनदेव चटोपाध्याय यांनी गुरुवारी दिली. सदर विधेयक सभागृहात मांडण्यात येणार असून त्यावर चर्चा करून ते अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी मंजूर करण्यात येणार आहे, असे विधानसभेचे अध्यक्ष बिमान बॅनर्जी यांनी सांगितले. बलात्काऱ्यांना फाशीची शिक्षा देण्यासाठी कायद्यात सुधारणा करणारे विधेयक पुढील आठवड्यात विशेष अधिवेशनात मांडण्याची घोषणा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केली होती.

राज्यात 'महिला राज'ची चर्चा; सुप्रिया सुळे, रश्मी ठाकरे यांची नावे मुख्यमंत्रीपदासाठी चर्चेत

मुरबाडच्या जागेवर शिवसेना ठाकरे गटाचाही दावा; महाविकास आघाडीत रस्सीखेच वाढणार!

हिरे क्षेत्र गंभीर संकटात; गेल्या तीन वर्षांत आयात-निर्यातीत मोठी घट,'जीटीआरआय’चा दावा

नव्या सरकारच्या स्वागतासाठी मंत्रालयात स्वच्छता मोहीम

‘मला काहीतरी सांगायचंय’; मुख्यमंत्र्यांच्या जीवनावरील नाटक, लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला