(संग्रहित छायाचित्र)
राष्ट्रीय

ममतांनी सरन्यायाधीशांसमोर स्वत:च मांडली बाजू; न्यायालयाची सरकारला नोटीस; निवडणूक आयोग सोमवारी बाजू मांडणार

मतदारयाद्यांच्या विशेष तपासणीविरोधात (एसआयआर) पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आवाज उठवत बुधवारी स्वत: सर्वोच्च न्यायालयात राज्याची बाजू मांडली. ‘बंद दाराआड न्याय रडकुंडीला आला आहे, निवडणूक आयोगाकडून राज्याला लक्ष्य केले जात आहे आणि एसआयआरद्वारे बंगालच्या जनतेवर 'बुलडोझर' फिरवले जात असल्याचा युक्तिवाद ममतांनी केला.

Swapnil S

नवी दिल्ली : मतदारयाद्यांच्या विशेष तपासणीविरोधात (एसआयआर) पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आवाज उठवत बुधवारी स्वत: सर्वोच्च न्यायालयात राज्याची बाजू मांडली. ‘बंद दाराआड न्याय रडकुंडीला आला आहे, निवडणूक आयोगाकडून राज्याला लक्ष्य केले जात आहे आणि एसआयआरद्वारे बंगालच्या जनतेवर 'बुलडोझर' फिरवले जात असल्याचा युक्तिवाद ममतांनी केला. दरम्यान, बॅनर्जी यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला नोटीस बजावली असून त्याची सुनावणी सोमवारी होणार आहे.

ममता यांनी सरन्यायाधीश सूर्य कान्त यांच्याकडे पाच मिनिटे बोलण्याची अनुमती मागितली, तेव्हा सरन्यायाधीशांनी त्यांना १५ मिनिटांचा वेळ दिला. ‘आपल्याला कोठेही न्याय मिळत नाही, निवडणूक आयोगाला आपण सहा पत्रे लिहिली तरीही कोणतेही उत्तर त्यावर मिळालेले नाही. आयोगाने ५८ मतदारांना वगळले आहे. त्यांच्याकडे ‘फॉर्म ६’ही आहे, ते बंगालला लक्ष्य करीत आहेत, केवळ बंगालसाठी सूक्ष्म निरीक्षक नियुक्त केले आहेत’, असे ममता यांनी सूर्य कान्त, न्या. बागची आणि न्या. पांचोली यांच्यासमोर स्पष्ट केले.

आयोगाला नोटीस

दरम्यान, ममता बॅनर्जी यांच्या याचिकेनंतर आता सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला नोटीस पाठवली आहे. निवडणूक आयोग येत्या सोमवारी आपले उत्तर निवडणूक आयोगापुढे सादर करणार आहे. त्यामुळे निवडणूक आयोग यावर नेमकी कोणती भूमिका घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Maharashtra SSC Result 2026 : दहावीचा निकाल जाहीर; 'या' वेबसाइट्सवरून लगेच पाहा मार्कशीट

Thane : १४ दरडप्रवण भागांतील रहिवाशांना नोटीस; मान्सूनपूर्व महापालिकेची हालचाल, नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्याचे आवाहन

Mumbai : आता नगरसेवकांची बायोमेट्रिक हजेरी; पालिका मुख्यालयातील भाजप कार्यालयात मशीन कार्यान्वित

Mumbai : अगरवाल रुग्णालयाच्या निवासी पुनर्विकासाला गती; केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाची मंजुरी, ३८ मजली दोन, तर २२ मजली इमारत

सोहराबुद्दीन शेख बनावट चकमक प्रकरण : निर्दोष मुक्त झालेल्या २२ आरोपींना मोठा दिलासा; सत्र न्यायालयाच्या निर्णयावर हायकोर्टाचे शिक्कामोर्तब