राष्ट्रीय

... तोपर्यंत जनतेचा मतदानाचा अधिकार हिरावू देणार नाही! ममता बॅनर्जीचा निर्धार

आपण हयात असेपर्यंत कोणालाही जनतेचा मतदानाचा अधिकार हिरावू देणार नाही, असा निर्धार पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी गुरुवारी येथे व्यक्त केला.

Swapnil S

कोलकाता : आपण हयात असेपर्यंत कोणालाही जनतेचा मतदानाचा अधिकार हिरावू देणार नाही, असा निर्धार पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी गुरुवारी येथे व्यक्त केला.

भाजपने ५०० पथके राज्यात सर्व्हेसाठी तैनात केली आहेत, मतदार यादीतून मतदारांची नावे वगळण्याचे त्याचे लक्ष्य आहे, असेही बॅनर्जी म्हणाल्या. तृणमूल काँग्रेसची युवा शाखा तृणमूल छात्र परिषदेच्या स्थापनादिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. सव्र्व्हेसाठी आपल्या घरी कोणी आले तर त्यांना तुमची माहिती देऊ नका, या माहितीचा वापर ते मतदार यादीतून तुमचे नाव वगळण्यासाठी करतील. त्यापेक्षा मतदान केंद्रांवर त्याची पडताळणी करा आणि आपली आधार कार्ड तयार ठेवा. भाजपच्या हुकूमावरून निवडणूक आयोग सरकारच्या अधिकाऱ्यांना धमकावत आहेत.

Maratha Reservation : मनोज जरांगे मराठा आरक्षणासाठी अखेर आझाद मैदानात; बेमुदत आंदोलनावर ठाम, पावसातही आंदोलकांचा उत्साह कायम

लातूर-नांदेडमध्ये मुसळधार पावसाचा कहर; बचावासाठी लष्कराची मदत, जनजीवन विस्कळीत

...तर मुख्यमंत्र्यांच्या कारकीर्दीला धोका! मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा इशारा

दीड दिवसाच्या बाप्पाला निरोप; २९,९६५ गणेशमूर्तीच विसर्जन

...तर भारताचा 'टॅरिफ' कमी करू! व्हाइट हाऊसचे सल्लागार पीटर नवारो यांचे वक्तव्य