राष्ट्रीय

ममता बॅनर्जी यांच्या कारला अपघात; डोक्याला झाली दुखापत

ममता बॅनर्जी यांच्या ताफ्यासमोर अचानक एक कार आली. त्यामुळे ममता यांच्या वाहनचालकाला अचानक ब्रेक मारावा लागला. यामुळे हा अपघात घडला.

Rakesh Mali

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांच्या कारला अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. त्या वर्धमानहून कोलकाता येथे परतत असताना त्यांच्या कारला अपघात झाला. या अपघातात ममता बॅनर्जी जखमी झाल्या आहेत.

खराब हवामानामुळे ममता बॅनर्जी या कारने परतत होत्या. यावेळी त्यांच्या ताफ्यासमोर अचानक एक कार आली. त्यामुळे ममता यांच्या वाहनचालकाला अचानक ब्रेक मारावा लागला. यामुळे हा अपघात घडला.

मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात ममता बॅनर्जी यांच्या डोक्याला किरकोळ दुखापत झाली असून त्यांना कोलकाता येथे आणले जात आहे. त्या आज दुपारी एका प्रशासकीय आढावा बैठकीसाठी वर्धमान येथे गेल्या होत्या.

संकटग्रस्त बळीराजाला २,२१५ कोटींची मदत; राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी

बेकायदा होर्डिंगवर कारवाईसाठी लवकरच नोडल यंत्रणा उभारणार; भोसले समितीचा अहवाल मंत्रिमंडळाने स्वीकारला

‘शहद’ऐवजी आता फक्त ‘शहाड’ स्टेशन! राज ठाकरेंच्या संतापानंतर रेल्वे प्रशासनाचा झपाट्याने निर्णय

सव्वाअकरा लाखांचे पक्षी चोरणारे अटकेत; कर्जत पोलिसांची धडाकेबाज कामगिरी

Mumbai Traffic : मुंबईत ठिकठिकाणी वाहतूककोंडी, नागरिक हैराण