राष्ट्रीय

Manipur Violence : विवस्त्र धिंड काढलेल्या महिलेची प्रतिक्रिया समोर ; पोलिसांवर केले गंभीर आरोप

आमच्या गावावर हल्ला करणाऱ्या जमावासोबत पोलीस देखील होते. पोलीसांनी आम्हाला घराजवळून उचललं आणि...

नवशक्ती Web Desk

मणिपूरमध्ये गेल्या काही महिन्यांपासून हिंसाचार सुरु आहे. आता मणिपूरमधील समोर आलेल्या एका व्हिडिओने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. मणिपूरमध्ये दोन महिलांची विवस्त्र धिंड काढून त्यांच्यावर सामूहिक अत्याचार करण्यात आल्याची माणूसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. महिलांची विवस्त्र धिंड काढण्यात आली त्या ठिकाणी पोलीस देखील उपस्थित असल्याची माहिती समोर आली आहे. विवस्त्र धिंड काढून लैंगिक अत्याचार झालेल्या महिलेची प्रतिक्रिया समोर आली आहे. या महिलेने पोलीसांनीच आम्हाला त्या नराधमांच्या ताब्यात दिलं असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे आणखीनच खळबळ माजली असून सर्वत्र या घटनेवर संताप व्यक्त केला जातोय.

पीडित महिलेची प्रतिक्रिया

निर्वस्त्र धिंड काढण्यात आली त्यावेळी पोलीस जमावासोबत होते. त्यांनीच आम्हाला त्या पुरषांसोबत सोडलं. असं पिडित महिलेनं सांगितलं आहे. इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार दोन पीडितांपैकी एका महिलेने घडलेला प्रकार सांगितला आहे. आमच्या गावावर हल्ला करणाऱ्या जमावासोबत पोलीस देखील होते. पोलीसांनी आम्हाला घराजवळून उचललं आणि गावापासून दूर नेत जमावासोबत सोडलं. पोलीसांनीच त्या नराधमांच्या ताब्यात दिलं. अशी प्रतिक्रिया पीडित महिलेनं दिली आहे. ही घटना ४ मे रोजी घडल्याचं समोर आलं आहे.

या दोन्ही महिलांपैक एक महिलेच वय हे २० वर्ष तर दुसऱ्या महिलेच वय ४० वर्ष आहे. व्हायरल व्हिडिओत पुरुषांच्या जमाव दोन महिलांना विवस्त्र करुन त्यांची धिंड काढत आहे. तर काही पुरुष त्यांना शेताकडे जबरदस्तीने खेचताना दिसत आहेत. १८ मे रोजी दाखल करण्यात आलेल्या पोलीस तक्रारीत पीडित महिलांनी क्रूरपणे विवस्त्र धिंड काढून सामूहिक अत्याचार केल्याचा आरोप केला आहे.

या प्रकरणी पोलीस काय म्हणाले

मणिपूर पोलिसांचे एसपी के मेघचंद्र सिंह यांनी या प्रकरणी एक निवेदन जारी केलं आहे. यात ४ मे रोजी ही घटना घडल्याचं सांगितलं आहे. यात नॉनगपोक सेकमाई पोलीस ठाण्यात सामूहिक बलात्कार, हत्या आणि अपहरण या कलमांसह इतर कलमांमध्ये दोषीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याचा आमचा प्रयत्न आहे, असं सांगितलं आहे.

"२६/११ नंतर पाकिस्तानला प्रत्युत्तर देणार होतो, पण...; पी. चिदंबरम यांचा गौप्यस्फोट

पावसाची विश्रांती; पूरस्थिती कायम! पूरग्रस्त शेतकऱ्यांना हवा मदतीचा आधार; अतिवृष्टी, गारपीट, टंचाईग्रस्तांना जिल्हा वार्षिक निधीतून मदत

झोपेतच सर्पदंश! ३ वर्षांच्या चिमुकलीसह मावशीचा मृत्यू; KDMC रुग्णालयावर निष्काळजीपणाचा आरोप

पृथ्वीराज चव्हाण, विखे-पाटील यांना कोर्टाचा दिलासा

चेंगराचेंगरी हा द्रमुकाचा कट; विजय थलापतींचा आरोप; उच्च न्यायालयात धाव