राष्ट्रीय

Manish Sisodia : मनिष सिसोदियांच्या कोठडीत वाढ; २० मार्चपर्यंत तिहार तुरुंगातच

दिल्लीच्या कथित मद्य घोटाळ्यामध्ये दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया (Manish Sisodia) यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे

प्रतिनिधी

दिल्लीच्या कथित मद्य घोटाळ्यात आरोपी असलेल्या दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया (Manish Sisodia) यांच्या जामीन अर्जावर आज राउज एवेन्यू न्यायालयात सुनावणी पार पडली. न्यायालयाने आज त्यांना २० मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यामुळे २० तारखेपर्यंत त्यांना तिहारमध्ये ठेवण्यात येणार आहे. विशेष सीबीआय न्यायाधीश एमके नागपाल यांनी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.

नेमकं प्रकरण काय?

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे निकटवर्तीय आणि दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदीया यांच्यावर आरोप करण्यात आले आहेत. दिल्लीत उत्पादन शुल्क विभागाच्यावतीने सुरु केलेले नवे मद्य धोरण हे त्यांच्या अटकेचे कारण असल्याचे सांगितले जात आहेत. या धोरणावरुन मनीष सिसोदिया यांची यापूर्वीही अनेकदा चौकशी झालेली आहे. त्यानंतर सीबीआयने उपमुख्यमंत्री सिसोदिया चौकशीत सहकार्य करत नसल्याचे कारण दिले आणि त्यांना अटक केली.

दरम्यान, मागच्या वर्षी जुलैमध्ये दिल्लीचे मुख्य सचिव नरेश कुमार यांनी राज्यपाल विनय कुमार सक्सेना यांच्याकडे एक अहवाल सादर केला होता. या अहवालामध्ये मनीष सिसोदियांवर गंभीर आरोप करण्यात आले होते. मद्य परवाना देताना त्याऐवजी कमिशन घेतले गेले. त्यानंतर हा पैसे आपने पंजाब विधानसभा निवडणुकीत वापरला, असा गंभीर आरोप मनीष सिसोदियांवर करण्यात आला. यानंतर ईडी आणि सीबीआयने प्रकारांची चौकशी करण्यात सुरुवात केली.

मुंबईत कोसळधार! पुढील काही तास धोक्याचे, ‘रेड अलर्ट’ जारी

मराठवाड्यात पावसाचा कहर; धाराशिव-छत्रपती संभाजीनगरमध्ये पूरस्थिती तीव्र, जायकवाडी धरणाचे दरवाजे उघडले

करूर चेंगराचेंगरी : मृतांची संख्या ३९ वर; विजय थलापतींकडून २० लाखांची मदत जाहीर, तपास समिती नियुक्तीचे आदेश

ठाण्यात पावसाचा जोर कायम; सखल भागांत पाणी साचले, नवरात्र आणि गरब्यावर पावसाचे सावट

Marathwada Floods : मराठवाड्यावर पुन्हा पुरसंकट; बीड, लातूर, धाराशिवमध्ये जोरदार पाऊस, जनजीवन विस्कळीत