X
राष्ट्रीय

CJP Protest Delhi : जागा सोडू नका; मनोज जरांगे यांचा सल्ला

जंतर मंतरवरील विद्यार्थ्यांनी कोणत्याही परिस्थितीत ही जागा सोडू नये. तुम्ही एकदा ही जागा सोडलीत तर सरकार तुमचे आंदोलन मोडून काढेल, असा सल्ला मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिला.

Swapnil S

नवी दिल्ली : जंतर मंतरवरील विद्यार्थ्यांनी कोणत्याही परिस्थितीत ही जागा सोडू नये. तुम्ही एकदा ही जागा सोडलीत तर सरकार तुमचे आंदोलन मोडून काढेल, असा सल्ला मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिला. मनोज जरांगे यांनी बुधवारी दिल्लीतील जंतर मंतर येथे सुरु असलेल्या आंदोलनस्थळी जाऊन कॉकरोच जनता पार्टीच्या अभिजीत दिपके यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

यावेळी मनोज जरांगे यांनी भाजपवर जोरदार टीका केली. विद्यार्थ्यांना न्याय मिळावा म्हणून मी इथे आलो आहे. भाजप सरकार प्रत्येकवेळी गोरगरीब लोकांच्या लेकरांवर अन्याय करते. या पुढच्या काळात सरकारने विद्यार्थ्यांवर हात उचलला तर यांचे महारष्ट्रातील फिरण पूर्ण बंद होणार आणि यांचा माज पूर्ण उतरवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

मालमत्तेच्या मालकी हक्काबाबत निर्णय घेण्याचा अधिकार निबंधकांना नाही; उच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्वाळा

Mumbai : राणीबागेतील बंगला उपमहापौरांना नाहीच; जलविभागाच्या अखत्यारीतील बंगल्याची आता चाचपणी

जेनेरिक औषधांवर २०० टक्के आयातकर- ट्रम्प; ऑगस्ट २०२८ नंतर होणार लागू, सर्वाधिक फटका भारताला

शिंदे चार दिवसांपासून दरे गावी, चर्चांना उधाण

पहिल्या यादीत केवळ ५३३ शेतकऱ्यांना कर्जमाफी; प्राप्तिकर विभागाकडून यादी न मिळाल्याने विलंब