Photo : X
राष्ट्रीय

'मीडिया ट्रायल' धोकादायक; ज्येष्ठ विधिज्ज्ञ मुकुल रोहटगी यांचे प्रतिपादन

'मीडिया ट्रायल' मध्ये कोणत्याही न्यायाधीशांची पूर्ण न्यायिक कारकीर्द संपवण्याची क्षमता असते, असे प्रतिपादन ज्येष्ठ विधिज्ज्ञ मुकुल रोहटगी यांनी केले. असलेल्या नकारात्मक 'मीडिया ट्रायल' मुळे होणारे नुकसान न्यायालयातून सुटका झाल्यानंतरही भरून येत नाही.

Swapnil S

नवी दिल्ली: 'मीडिया ट्रायल' मध्ये कोणत्याही न्यायाधीशांची पूर्ण न्यायिक कारकीर्द संपवण्याची क्षमता असते, असे प्रतिपादन ज्येष्ठ विधिज्ज्ञ मुकुल रोहटगी यांनी केले. असलेल्या नकारात्मक 'मीडिया ट्रायल' मुळे होणारे नुकसान न्यायालयातून सुटका झाल्यानंतरही भरून येत नाही.

न्या. यशवंत वर्माप्रकरणी ते म्हणाले की, अनेक वर्षे सुरू रोहटगी म्हणाले की, एका न्यायाधीशाच्या घरातून कथित पैसे मिळण्याचा आरोप झाला. संपूर्ण मीडियाने त्यांच्यावर आरोप केले. चौकशीनंतर त्यांची सुटका झाली तरीही ते प्रामाणिक न्यायाधीश होते, असे कोणीही मानणार नाही. त्यांचे करिअर संपुष्टात येईल.

दरम्यान, रोहटगी यांनी न्या. वर्मा यांची बाजू न्यायालयासमोर मांडली होती. ज्यात लोकसभा अध्यक्षांच्या निर्णयाला आव्हान दिले होते. रोहटगी यांनी याबाबतचे सर्व मुद्दे एका परिसंवादात व्यक्त केले.

मुख्य प्रवाहातील प्रसारमाध्यमे जास्त धोकादायक

ते म्हणाले की, टीव्ही वाहिन्यांवर सातत्याने दाखवल्या जाणाऱ्या दृश्यांमुळे आरोपांची पुनरावृत्ती होते. न्यायालयात पुरावे तपासण्यापूर्वीच तत्काळ न्यायाची परिस्थिती निर्माण केली जाते. 'मीडिया ट्रायल' ही सर्वात मोठी समस्या आहे. सोशल मीडियापेक्षा मुख्य प्रवाहातील प्रसारमाध्यमे जास्त धोकादायक आहेत. कारण त्यांना अधिक विश्वासार्ह मानले जाते. तुम्ही कोणत्याही व्यक्तीचा चेहरा टीव्हीवर लाख वेळा दाखवता आणि म्हणता, हा माणूस गँगस्टर आहे. हे सोशल मीडियापेक्षा अधिक नुकसान करतो, असे ते म्हणाले. ते म्हणाले की, प्रसारमाध्यमांनी खासगीपणा, निष्पक्ष सुनावणीचा मर्यादाभंग केला आहे. मीडियासाठी विशेष लवाद तयार करण्याची सूचना त्यांनी फेटाळून लावली. वरिष्ठ वकील पर्सिवल बिलीमोरिया म्हणाले की, मुख्य प्रवाहातील प्रसारमाध्यमांच्या चुकीच्या माहितीचा परिणाम न्यायालयांवर होत आहे. भटक्या कुत्र्यांशी संबंधित सुरू असलेल्या खटल्यांबाबत ते म्हणाले की, कुत्रे हे सातत्याने लहान मुलांना ठार करतात, अशी धारणा न्यायालयांना झाली आहे. कुत्रे हे लहान मुलांना मारतात, असा समज सध्याचे न्यायाधीश करून बसले आहेत. सातत्याने मीडिया रिपोर्टिंग आणि अल्गोरिदमवर आधारित प्रसार केल्याने जेथे असत्य दावेही सत्य मानले जातात. ही प्रक्रिया सोशल मीडियावरच नव्हे तर टीव्ही वाहिन्यांवरून होत आहे, असे त्यांनी सांगितले.

उल्हासनगर महापालिकेत सत्तासंघर्षाला वेग; शिवसेना शिंदे गटामार्फत सत्तास्थापनेच्या हालचाली सुरू

काँग्रेसमध्ये नाराजी! वर्षा गायकवाड यांच्या राजीनाम्याची मागणी

मुंबईतील वायू प्रदूषण पुन्हा वाढले; थंडीच्या मोसमात शहर धुक्याने वेढले

मेन्टेनन्स योग्यच! प्रलंबित देखभाल शुल्क वसूल करण्याच्या सोसायटी निर्णयाला मान्यता

मध्य रेल्वेवर आज मेगाब्लॉक; CSMT - विद्याविहार स्थानकांदरम्यान अप व डाउन मार्गावर दुरुस्ती