राष्ट्रीय

मेघालयमध्ये कोळसा खाणीत स्फोट, किमान १८ जणांचा मृत्यू; अनेक मजूर अडकल्याची भीती

किमान १८ मजुरांचा मृत्यू झाला असून अनेक मजूर अजूनही खाणीत अडकले असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. मेघालयचे मुख्यमंत्री के. संगमा यांनी परिस्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी दोन कॅबिनेट मंत्र्यांनाही घटनास्थळी पाठवले आहे.

Krantee V. Kale

शिलाँग : मेघालयमधील 'ईस्ट जैंतिया हिल्स' जिल्ह्यात गुरुवारी एका बेकायदेशीर कोळसा खाणीत स्फोट झाला. या दुर्घटनेत किमान १८ मजुरांचा मृत्यू झाला असून अनेक मजूर अजूनही खाणीत अडकले असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. मेघालयचे मुख्यमंत्री के. संगमा यांनी परिस्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी दोन कॅबिनेट मंत्र्यांनाही घटनास्थळी पाठवले आहे.

हा अपघात सकाळी थांग्स्कु परिसरात झाला. आतापर्यंत १८ मृतदेह बाहेर काढण्यात आले असून स्फोटाच्या वेळी खाणीत किती मजूर होते, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. खाणीत आणखी लोक अडकले असण्याची शक्यता आहे. स्फोटाचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. विशेष म्हणजे, राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने २०१४ मध्ये मेघालयमध्ये ‘रॅट-होल’ कोळसा खाणकाम आणि इतर अवैज्ञानिक खाणकाम पद्धतींवर बंदी घातली होती.

मेघालयचे मुख्यमंत्री के. संगमा यांनी स्फोटासाठी जबाबदार असलेल्यांवर सरकार कठोर कारवाई करेल, असे शुक्रवारी सकाळी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे. मंत्र्यांना घटनास्थळी भेट देऊन अधिकाऱ्यांची भेट घेण्यास आणि बचावकार्य, मदतकार्य व कायदा-सुव्यवस्थेच्या परिस्थितीचा आढावा घेण्यास सांगण्यात आले आहे, अशी माहिती त्यांनी दिली. या घटनेसाठी जबाबदार असलेल्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश पोलिसांना देण्यात आले आहेत. बेकायदेशीर खाणकाम अजिबात सहन केले जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. मुख्यमंत्र्यांनी या घटनेत प्राण गमावलेल्यांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारकडून प्रत्येकी ३ लाख रुपयांची सानुग्रह मदत जाहीर केली.

राज्यात १ मेपासून परवानाधारक रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी अनिवार्य; मराठी भाषेचे ज्ञान नसलेल्यांचे परवाने रद्द करणार - सरनाईक

३६ तासांच्या 'बंद'नंतरही ठाण्यात कमी दाबानेच पाणी; ऐन उन्हाळ्यात पाणीबंदीने नागरिक हैराण

रुग्णालयच आता होणार अर्जदार! अर्जमंजुरीची प्रक्रिया ८ तासांत; सीएम सहाय्यता निधीची नवीन प्रणाली

'व्हायरल'च्या नादात मर्यादा ओलांडल्या! भररस्त्यात तरुणीशी गैरवर्तन; VIDEO व्हायरल होताच पोलिसांची धडाकेबाज कारवाई

रांजणगाव महागणपती मंदिर डागडुजीसाठी तीन महिने बंद