राष्ट्रीय

Shawarma मध्ये चक्क धातूचे तुकडे, तक्रारीनंतर Swiggy ने दिलेल्या उत्तरामुळे ग्राहक खवळला!

'माफी म्हणून मी तुम्हाला ५० रुपये परत देऊ शकतो. मी ही प्रक्रिया सुरू करू का?' असे स्विगीच्या एजंटने विचारले...

Swapnil S

आपण अनेकदा फूड डिलिव्हरी अॅप्स 'स्विगी' किंवा 'झोमॅटो' वरून ऑर्डर करतो. कधी कधी खूप चविष्ट पदार्थ डिलिव्हर होतात, पण हल्ली हलगर्जीपणाची अनेक उदाहरणे समोर येत आहेत. बेंगळुरूमध्ये एका व्यक्तीने 'स्विगी'वरून चिकन शोरमा मागवला, पण तो खाताना त्याला शोरमामध्ये चक्क धातूचा तुकडा सापडला. याबाबत त्याने स्विगीकडे तक्रार केली असता स्विगीने असे काही उत्तर दिले की तो अजूनच संतापला.

तरुणाने 'रेडिट'वर एका पोस्टद्वारे सर्व घटनाक्रम सांगितला आहे. बेंगळुरूच्या नागावरा येथील अ‍ॅब्सोल्युट शोरमामधून या तरुणाने स्विगीद्वारे शोरमा मागवला. तो खायला सुरूवात केल्यावर त्याला काहीतरी कुरकुरीत जाणवले आणि मग त्यात धातूचा तुकडा असल्याचे समजले. कहर म्हणजे हा धातूचा तुकडा त्याच फ्लेम ग्रिलचा होता ज्याचा शोरमा बनवण्यासाठी वापर केला जातो.

बिल १६० अन् रिफंड फक्त ५० रुपये-

त्या व्यक्तीने लगेच स्विगी सपोर्ट टीमकडे याची तक्रार केली आणि संपूर्ण पैसे परत करण्याची मागणी केली. यामुळे रेस्टॉरंटवर काय कारवाई करणार हेही त्याने विचारले. तथापि, फूड सेफ्टीच्या उल्लंघनाबद्दल माफी न मागता किंवा पूर्ण परतावा न देता स्विगीने त्याला फक्त 50 रुपये परत करण्याची ऑफर दिली. उल्लेखनीय म्हणजे शोरमाचे बिल 160 रुपयांपेक्षा जास्त आले होते.

'माफी म्हणून मी तुम्हाला ५० रुपये परत देऊ शकतो. मी ही प्रक्रिया सुरू करू का?' असे स्विगीच्या एजंटने त्याला विचारले होते. माफी म्हणून तुटपुंजी रक्कम स्वीकारण्यास ग्राहकाने नकार दिला आणि धातूच्या तुकड्यामुळे गुदमरून मृत्यू झाला असता, असे स्विगी एजंटला सुनावले.

आता ग्राहकाची पोस्ट व्हायरल झाली असून नेटकरीही सतत कानावर येणाऱ्या अशा प्रकारांमुळे संताप व्यक्त करीत असून काहीतरी ठोस उपाययोजनेची मागणी करीत आहेत.

शिवरायांचे किल्ले ‘युनेस्को’च्या जागतिक वारसास्थळ यादीत

मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्याचा कॅनडातील कपिल शर्माच्या कॅफेवर गोळीबार

सरकारची इलेक्ट्रिक ट्रक प्रोत्साहन योजना सुरू; PM e-Drive अंतर्गत ९.६ लाख रु.मिळणार

टेस्ला पुढील आठवड्यात भारतात प्रवेश करण्यास सज्ज; वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये पहिले शोरूम सुरू करणार

अजित पवारांची माफी मागा! लक्ष्मण हाके यांना राष्ट्रवादीची नोटीस