बंगळुरू : कर्नाटक सरकारने सरकारी दूध उत्पादक संघ ‘नंदिनी’ दुधाच्या दरात चार रुपयांनी वाढ करत दूध ग्राहकांना मोठा झटका दिला आहे. नवीन दर १ एप्रिलपासून लागू होणार आहेत. यापूर्वी ‘नंदिनी’ दुधाचे दर दोन रुपयांनी वाढवण्यात आले होते. मात्र, आता नव्या दराने दूध आणि दह्याची विक्री केली जाणार असल्याचे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले.
कर्नाटक राज्याचे पशुपालनमंत्री के. वेंकटेश यांनी याबाबतची घोषणा केली. ४२ रुपयांना मिळणारे टोन्ड दूध आता ४६ रुपयांना मिळेल, एकसंध टोन्ड दूधाची किंमत ४३ रुपयांवरून ४७ इतकी झाली आहे. तसेच ५० रुपये प्रति किलोने मिळणारे दही आता ५४ रुपयांना मिळेल.