राष्ट्रीय

राजस्थानात मॉब लिंचिंग मुस्लीम तरुणाचा मृत्यू

गावकऱ्यांना कळताच त्यांनी त्यांचा पाठलाग सुरू केला त्यांना अडवून मारहाण केली

नवशक्ती Web Desk

अलवर: येथील जिल्ह्यात मॉब लिंचिंगमध्ये एका मुस्लीम तरुणाचा मृत्यू झाला आहे. लाकूड कापायला गेलेल्या या तरुणाला बेदम मारहाण केली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तीन ते चार जणांना या प्रकरणी अटक केली आहे.

अलवार जिल्ह्यातील नारोल गावात शुक्रवारी सकाळी ही घटना घडली. मृत तरुण वशीम हा दोघांसह लाकडे कापायला गेला होता. या भागात वनविभागाची गाडी फिरत असल्याची सूचना त्यांना मिळाली. त्यामुळे घाबरून त्यांनी लाकडे कापणे बंद केले. ते पळायला लागले. ही बाब गावकऱ्यांना कळताच त्यांनी त्यांचा पाठलाग सुरू केला. त्यांना अडवून मारहाण केली. त्यात वशीमचा मृत्यू झाला.

UPSC उमेदवार पडताळणीसाठी AI ची मदत घेणार

Kalyan-Dombivli : रहिवाशांची फसवणूक करणाऱ्यांवर कारवाई - शिंदे

संघर्षाची सुरुवात व शेवट कसा करायचा हे भारताकडून शिकावे! हवाई दलप्रमुख ए.पी. सिंग यांचे प्रतिपादन

आत्मनिर्भर भारतच देशाची शक्ती - मोदी

अमेरिकेचे व्हिसास्त्र! भारतीयांच्या 'अमेरिकन ड्रीम'ला ट्रम्प यांचा सुरुंग; नव्या H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये शुल्क आकारणार