राष्ट्रीय

काश्मीर, गुजरात, पंजाब, राजस्थान पाकिस्तानला लागून असलेल्या सीमावर्ती भागात आज मॉक ड्रिल

पाकिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या राज्यांमध्ये म्हणजेच गुजरात, पंजाब, राजस्थान आणि जम्मू-काश्मीरमध्ये आता पुन्हा एकदा गुरुवारी सायंकाळी मॉक ड्रिल आयोजित करण्यात आले आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : पाकिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या राज्यांमध्ये म्हणजेच गुजरात, पंजाब, राजस्थान आणि जम्मू-काश्मीरमध्ये आता पुन्हा एकदा गुरुवारी सायंकाळी मॉक ड्रिल आयोजित करण्यात आले आहे.

या काळात नागरिकांना सतर्क राहण्याचे निर्देशही दिले जाणार आहेत. पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने ६-७ मे च्या मध्यरात्री ऑपरेशन सिंदूर सुरू केले. सुमारे २५ मिनिटे चाललेल्या या ऑपरेशनमध्ये भारतीय सैन्याने पाकिस्तान आणि पीओकेमधील नऊ दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त

केले. या कारवाईत सुमारे १०० दहशतवादी ठार झाले. त्या ऑपरेशनदरम्यान देशभरात मॉक ड्रिल राबविण्यात आले होते.

दहशतवादी तळांची यादी

भारताच्या ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानमध्ये प्रचंड घबराटीचे वातावरण आहे. भारताने आतापर्यंत फक्त नऊ दहशतवादी तळांवर हवाई हल्ले केले आहेत. अशा परिस्थितीत पाकिस्तानमधील आणखी १२ दहशतवादी तळांची यादी भारताकडे आहे. यापूर्वीच भारताने स्पष्ट केले होते की, दहशतवाद्यांचे उर्वरित तळही नष्ट केले जातील, असे भारताने यापूर्वीच स्पष्ट केले आहे. भारत यासाठी पूर्णपणे सज्ज आहे. भारताच्या सीमावर्ती भागात हवाई संरक्षण यंत्रणाही सतर्क आहेत. पाकिस्तानकडून नियंत्रण रेषेवर होणारा गोळीबार पाहून भारतीय सैन्याने काश्मीरच्या १० जिल्ह्यांमध्ये नियंत्रण केंद्रे स्थापन केली आहेत. आता अशातच सीमावर्ती भागात मॉक ड्रिल आयोजित केल्यामुळे पाकिस्तानही धास्तावला आहे.

Iran-US-Israel युद्धाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचा निर्णय; नैसर्गिक वायू पुरवठ्यासाठी 'आवश्यक वस्तू कायदा' लागू, जाणून घ्या अर्थ

मुंबईतील हॉटेल्स बंद होणार? LPG टंचाईमुळे हॉटेल उद्योग संकटात; काळ्या बाजारातून गॅस खरेदीची भीती

बारावीच्या प्रश्नपत्रिकेतील QR कोड चर्चेत; स्कॅन करताच वाजलं 'रिकरोल' गाणं, CBSE कडून स्पष्टीकरण, पाहा Video

रस्ते अपघातांमुळे ५८ बसचालक बडतर्फ; २०२२ ते २०२४ दरम्यानच्या अपघातांमुळे कारवाई; उपमुख्यमंत्री शिंदेंची विधान परिषदेत माहिती

मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम; Akasa Air च्या वेळापत्रकात बदल, जेद्दाहसाठी उड्डाणे सुरू तर काही शहरांतील सेवा बंद