संग्रहित छायाचित्र  एएनआय
राष्ट्रीय

मोदी व्हर्चुअल 'ब्रिक्स' शिखर परिषदेला अनुपस्थित राहणार

ब्राझीलचे अध्यक्ष लुला दा सिल्वा यांनी ८ सप्टेंबरला बोलावलेल्या 'ब्रिक्स' नेत्यांच्या व्हर्चुअल शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदींऐवजी भारताचे प्रतिनिधित्व परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर करणार आहेत. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी एक निवेदन जारी करून ही माहिती दिली.

Swapnil S

नवी दिल्ली : ब्राझीलचे अध्यक्ष लुला दा सिल्वा यांनी ८ सप्टेंबरला बोलावलेल्या 'ब्रिक्स' नेत्यांच्या व्हर्चुअल शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदींऐवजी भारताचे प्रतिनिधित्व परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर करणार आहेत. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी एक निवेदन जारी करून ही माहिती दिली.

भारताच्यावतीने परराष्ट्र मंत्री जयशंकर यात सहभागी होणार आहेत. या परिषदेत अमेरिकेने लादलेल्या शुल्कांना तोंड देण्याच्या आणि बहुपक्षीय सहकार्याला चालना देण्याच्या मार्गांवर चर्चा केली जाणार आहे.

अमेरिकन 'टॅरिफ 'मुळे भारताची सावध भूमिका

मोदींच्या अनुपस्थितीवरून २०२६ च्या 'ब्रिक्स' शिखर परिषदेचे अध्यक्षपद भूषवण्यापूर्वी भारत सावधगिरी बाळगत आहे, अशी शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, अमेरिकेने नुकतीच शुल्क मागे घेण्याच्या बदल्यात भारताने 'ब्रिक्स' मधून बाहेर पडावे, अशी मागणी केली आहे. त्यामुळे भारत 'ब्रिक्स' बाबत सावध पावले टाकत असल्याची शक्यता आहे.

Independence Day 2026 : 'सप्तधारा', विकसित भारत अन् आत्मनिर्भरता; पंतप्रधान मोदींच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे, वाचा सविस्तर

नाशिक-विदर्भ प्रवाशांसाठी खुशखबर! 'स्पेशल'चा टॅग हटला, नाशिक रोड-बडनेरा मेमू आता नियमित, १६ स्थानकांना थांबा

Video : अवघ्या ५ मिनिटांच्या उशिराची 'अशी' शिक्षा? डिलिव्हरी बॉयचा मोबाईल हिसकावून फ्लॅटमध्ये नेलं अन्...

CJP चे Instagram हँडल अचानक बंद, काही तासांत पुन्हा सुरू; अभिजीत दिपके म्हणाले - 'स्वातंत्र्यदिनी आमचा आवाज...

Navi Mumbai Airport : 'पिंगा'च्या तालावर थिरकल्या तिरंगी पताका; स्वातंत्र्यदिनाची भन्नाट सजावट सोशल मीडियावर व्हायरल; VIDEO