राष्ट्रीय

पुढच्या वर्षी पुन्हा येण्याचा मोदींनी व्यक्त केला विश्वास ; परिवारवादावर देखील प्रहार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिल्लीतील लाल किल्ल्यावर ध्वाजारोहन पार पडलं. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८८ मिनिटं देशाला संबोधित केलं.

नवशक्ती Web Desk

आज देशाच्या ७७ व्या स्वातंत्र्य दिनाचे अवचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिल्लीतील लाल किल्ल्यावर ध्वाजारोहन पार पडलं. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८८ मिनिटं देशाला संबोधित केलं. यावेळी त्यांनी अनेक महत्वाचे मुद्दे मांडले. तसंच देशातील युवकांना महत्वाचा संदेश दिला. मोदींनी परिवार वादावर प्रहार करत यामुळे देशाच्या विकासाला ब्रेक लागल्याचं सांगितलं. महत्वाचं म्हणजे पुढच्या वर्षी देखील मीच लाल किल्ल्यावरुन भाषण करणार असा विश्वास मोदींनी व्यक्त केला.

यावेळी बोलताना ते म्हणाले की, मी तुमच्यातून आलोय. पुढील वर्षी या लाल किल्ल्यावरुन मी तुमच्यामोसर देशाचं यश मांडणार आहे. मी तुमच्यासाठीच जगतोय. मी जे कष्ट करतोय ते देखील तुमच्यासाठीचं. तुम्ही मला ही जबाबदारी दिली म्हणून मी हे करत आहे. हा देश माझं कुटुंब असल्याने माझ्या कुटुंबातील लोकांना झालेलं दु:ख मी पाहू शकत नाही, असं मोदी म्हणाले.

परिवारवादावर प्रहार

यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी परिवारवादावर आघात केला. ते म्हणाले की, मी भ्रष्टाराच्या विरोधात अखंड लढणार आहे. या देशातून परिवारवाद उखडून लावणार आहे. लोकशाहीत परिवारवादी पक्ष ही विकृती आहे. परिवारवादातमुळे विकासाला ब्रेक लागला आहे. मी लांगुलचालनाच्या विरोधात लढथ राहणार आहे.

राष्ट्र प्रथम

मोदी म्हणाले की, २०१४ साली मी तुम्हाला आश्वासन दिलं होतं की, मी देशात परिवर्तन आणणार आहे. १४० कोटी कुटुंबीयांनी माझ्यावर विश्वास ठेवला. तो विश्वास मी सार्थ ठरवण्याचा प्रयत्न करणार आहे. मी रिफॉर्म, परफॉर्म आणि ट्रान्सफॉर्मच्या माध्यमातून दिलेलं आश्वासन पुर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे. यासाठी नेशन फर्स्ट आणि राष्ट सर्वोपरी आहे. परिवर्तनाच्या आधारावर २०१९ साली तुम्ही पुन्हा आशिर्वाद दिला आहे.

भ्रष्टाचाराने देश पोखरला

देशासमोर आसलेल्या तीन वाईट प्रवत्तींना उल्लेख पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला आहे. भ्रष्टाचार, घराणेशाही आणि द्वेषभावना या तीन वाईट प्रवृत्तींचा उल्लेख त्यांनी केला. ते म्हणाले की, देशाच्या सामर्थ्याला भ्रष्टाचाराने वाळवीप्रमाणे पोखरुन काढलं आहे. प्रत्येक क्षेत्रात भ्रष्टाचार विरोधी लढा होणं आवश्यक आहे. यानंतर घराणेशाही ही दुसरी अडचण आहे. तर द्वेषभावना ही तिसरी अडचण आहे. यावेळी त्यांनी देशात महिला वैमानिकांची सख्या सर्वाधिक असल्याचं सांगत २ कोटी लखपती दीदींचं टार्गेट घेऊन आम्ही काम करत असल्याचं सांगितलं.

भिवंडीत १५३ मतदान केंद्र संवेदनशील घोषित; शहरातील २१ टक्के मतदान केंद्र संवेदनशील, पोलिसांनी विशेष खबरदारी वाढवली

Thane Election : ठाण्यात १७६ मतदान केंद्र संवेदनशील; निवडणूक शांततेसाठी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त

मतमोजणीच्या दिवशी बिनविरोध उमेदवारांची घोषणा; राज्य निवडणूक आयोगाच्या आयुक्तांची माहिती

Thane Election : ठाण्यात रंगले 'बॅनर' युद्ध; सत्ताधारी-विरोधक आमने-सामने; विकास विरुद्ध असंतोष

आयआयटी मुंबईत 'परमरुद्र' सुपरकॉम्प्युटर कार्यान्वित; सी-डॅकच्या माध्यमातून उभारणी; प्रगत संगणकीय संशोधनासाठी होणार मदत