संग्रहित छायाचित्र  एएनआय
राष्ट्रीय

मोठी किंमत मोजावी लागली तरी शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही; ट्रम्प यांच्या ‘टॅरिफ’वर मोदींचे उत्तर

भारत आपल्या शेतकऱ्यांच्या, पशुपालकांच्या, मच्छिमारांच्या हिताच्या बाबतीत कुठल्याही प्रकारची तडजोड करणार नाही. यासाठी मोठी किंमत मोजावी लागेल याची आपल्याला जाणीव आहे. परंतु, मी त्यासाठी तयार आहे. भारत आपल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. त्यांच्या कल्याणासाठी मी प्रत्येक आव्हानाला तोंड देण्यासाठी तयार आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी येथे स्पष्ट केले.

Swapnil S

नवी दिल्ली : भारत आपल्या शेतकऱ्यांच्या, पशुपालकांच्या, मच्छिमारांच्या हिताच्या बाबतीत कुठल्याही प्रकारची तडजोड करणार नाही. यासाठी मोठी किंमत मोजावी लागेल याची आपल्याला जाणीव आहे. परंतु, मी त्यासाठी तयार आहे. भारत आपल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. त्यांच्या कल्याणासाठी मी प्रत्येक आव्हानाला तोंड देण्यासाठी तयार आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी येथे स्पष्ट केले. मोदी यांची ही टिप्पणी थेट अमेरिकेसाठी संदेश असल्याचे मानले जात आहे.

भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्यामुळे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी भारतावर २५ टक्के अतिरिक्त आयात शुल्क (टॅरिफ) लादत असल्याची घोषणा केली. ट्रम्प यांनी याआधी जाहीर केलेले २५ टक्के शुल्क लागू होण्याच्या १४ तास आधी ट्रम्प यांनी हा नवा आदेश काढला आहे. आधीच्या २५ टक्के आयात शुल्काची अंमलबजावणी गुरुवारपासून सुरू झाली आहे, तर अतिरिक्त कराची अंमलबजावणी व्हाइट हाऊसमधून आदेश निघाल्यापासून २१ दिवसांनी केली जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर मोदी यांनी वरील बाब स्पष्ट केली आहे.

भारत आपल्या शेतकऱ्यांच्या, पशूपालकांच्या व मच्छिमारांच्या हिताच्या बाबतीत कुठल्याही प्रकारची तडजोड करणार नाही. वाढत्या आंतरराष्ट्रीय दबावाला न जुमानता मोदी यांनी ग्रामीण भारताच्या, खेड्यांमधील समुदायांच्या संरक्षणाबाबतचा सरकारचा निर्धार मोदी यांनी यावेळी अधोरेखित केला.

अन्यायकारक निर्णय

ट्रम्प यांनी केलेल्या अतिरिक्त २५ टक्के आयात शुल्काच्या घोषणेनंतर भारताने अमेरिकेला ठणकावले आहे. अमेरिकेचा हा निर्णय अत्यंत दुर्दैवी, अवास्तव आणि अन्यायकारक असल्याचे भारताने म्हटले आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी एक्सवर (ट्विटर) पोस्ट शेअर करत ही प्रतिक्रिया दिली आहे.

ठाणे स्थानकाच्या विस्तारीकरणाला प्रारंभ; १५ डब्यांच्या लोकलसाठी फलाटांची लांबी वाढविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू

“२० वर्षांपासूनचं स्वप्न अखेर साकार; तुम्ही फक्त वर्ल्डकप नव्हे, तर..."; विश्वविजेत्या भारतीय संघासाठी मिताली राजची इमोशनल पोस्ट

इतिहास रचला! भारताच्या महिला क्रिकेटपटूंनी प्रथमच विश्वचषक जिंकला; दक्षिण आफ्रिकेला चारली धूळ

कोइंबतूर एअरपोर्टजवळील धक्कादायक घटना; कॉलेजच्या विद्यार्थिनीचे अपहरण करून तिघांनी केला गँगरेप; प्रियकरालाही केली मारहाण

'कोणीतरी मराठी अभिनेत्री आहे, पण जोपर्यंत रंगेहाथ पकडत नाही...'; गोविंदाच्या अफेअरच्या चर्चांवर नेमकं काय म्हणाली पत्नी सुनीता?