Photo : X (@rashtrapatibhvn)
राष्ट्रीय

मोदी, शहांनी घेतली राष्ट्रपती मुर्मूंची स्वतंत्र भेट; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहा यांनी रविवारी स्वतंत्रपणे भेट घेतली. मात्र, या भेटीचे कारण समजू शकले नाही. त्यामुळे राजकीय वर्तुळात याबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहा यांनी रविवारी स्वतंत्रपणे भेट घेतली. मात्र, या भेटीचे कारण समजू शकले नाही. त्यामुळे राजकीय वर्तुळात याबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. इंग्लंड, मालदीवच्या दौऱ्यावरून आल्यानंतर पंतप्रधानांनी राष्ट्रपतींची रविवारी भेट घेतली.

संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू असताना ही भेट झाल्याने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. सरकारकडून कोणते मोठे पाऊल उचलण्यात येणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

या भेटीत काय चर्चा झाली याची अधिकृत माहिती जाहीर झाली नाही. पण, अचानक एकाच दिवसात पंतप्रधान व गृहमंत्री राष्ट्रपतींना स्वतंत्रपणे भेटले. त्यामुळे ही भेट महत्त्वाची मानली जात आहे.

५ ऑगस्टचे खास महत्त्व

उद्या, ५ ऑगस्ट आहे. मोदी सरकारने याच दिवशी आतापर्यंत मोठे निर्णय घोषित केले आहेत. ५ ऑगस्ट २०१९ रोजी जम्मू-काश्मिरातून कलम ३७० हटवले, ५ ऑगस्ट २०२० रोजी पंतप्रधानांनी अयोध्येत राम मंदिराचे भूमिपूजन केले होते.

प्रवाशांनो लक्ष द्या! UTS ॲपमधून ट्रेन पास बुकिंग बंद; आता RailOne वापरा; मिळेल ३ टक्के डिस्काउंटही, वाचा सविस्तर

४० ठार, १०० जखमी; नववर्षाच्या पार्टीदरम्यानच बारमध्ये भीषण स्फोट; स्वित्झर्लंडच्या आलिशान 'स्की रिसॉर्ट'मध्ये मोठी दुर्घटना

एबी फॉर्म गिळला की फाडला? पुण्यातील शिंदेसेनेच्या उमेदवाराने स्वतः केला खुलासा, म्हणाले - "भावनेच्या भरात माझ्याकडून...

नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबईच्या लोकल ट्रेन्सची खास 'हॉर्न सलामी'; रात्री १२ चा ठोका वाजताच CSMT वर जल्लोष; Video व्हायरल

नाशिक-सोलापूर-अक्कलकोट कॉरिडॉरला केंद्राची मंजुरी; 'या' जिल्ह्यांना थेट फायदा