संग्रहित छायाचित्र
राष्ट्रीय

आता विद्यार्थी करणार मोदी-तत्त्वाचा अभ्यास; वडोदरा विद्यापीठाच्या समाजशास्त्र अभ्यासक्रमात समावेश

गुजरातच्या वडोदरा येथील महाराजा सयाजीराव विद्यापीठाने आपल्या समाजशास्त्र पदव्युत्तर अभ्यासक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'करिष्माई नेतृत्वाचा' आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या विषयांचा समावेश केला आहे.

Swapnil S

वडोदरा : गुजरातच्या वडोदरा येथील महाराजा सयाजीराव विद्यापीठाने आपल्या समाजशास्त्र पदव्युत्तर अभ्यासक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'करिष्माई नेतृत्वाचा' आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या विषयांचा समावेश केला आहे. समाजावरील मोदी व संघाच्या प्रभावाचा वैज्ञानिक अभ्यास करणे हा यामागील मुख्य उद्देश आहे, असे विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी सांगितले.

विद्यापीठाने आपल्या दोन वर्षांच्या एमए (समाजशास्त्र) अभ्यासक्रमात 'सोशॉलॉजी ऑफ पॅट्रियॉटिझम' (देशभक्तीचे समाजशास्त्र) नावाचा नवा विषय सुरू केला आहे. समाजशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. वीरेंद्र सिंह यांनी सांगितले की, नरेंद्र मोदी यांच्या करिष्माई नेतृत्वाचा अभ्यास जर्मनीचे प्रसिद्ध समाजशास्त्रज्ञ मॅक्स वेबर यांच्या सिद्धांतानुसार केला जाईल. महात्मा गांधी आणि मार्टिन ल्यूथर किंग यांच्याप्रमाणेच त्यांच्यातील करिष्माई नेतृत्वाचा वैज्ञानिक दृष्टिकोनातून शोध घेतला जाईल. एमएचे विद्यार्थी जेव्हा ग्रामीण भागात नीती आयोगाच्या सार्वजनिक प्रकल्पांचे सर्वेक्षण करत होते, तेव्हा त्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जोडलेले लोक या प्रकल्पांची अंमलबजावणी करताना आढळले. यावरूनच या गटाचा वैज्ञानिक समाजशास्त्रीय अभ्यास करण्याची गरज भासली, असे डॉ. सिंह यांनी स्पष्ट केले.

मोदी-तत्त्वात काय असेल?

डॉ. वीरेंद्र सिंह यांच्या मते, राजकीय आणि नेतृत्व क्षेत्रात मोदींची चर्चा अपरिहार्य आहे. ते इतके लोकप्रिय का होत आहेत, त्यांची लोकांमध्ये स्वीकारार्हता कशी आहे आणि ते इतका काळ सत्तेत कसे आहेत, याचा अभ्यास या अभ्यासक्रमात केला जाईल. याशिवाय, नोटबंदी, डिजिटल क्रांती, फास्टॅग आणि जलशक्ती मंत्रालय यांसारख्या धोरणांचा लोकांवर झालेला परिणाम, प्रसारमाध्यम आणि डिजिटल राष्ट्रवाद, जागतिकीकरण आणि ओळख राजकारण या विषयांवरही 'मोदी-तत्त्व' या संकल्पनेंतर्गत चर्चा केली जाणार आहे.

Independence Day 2026 : 'सप्तधारा', विकसित भारत अन् आत्मनिर्भरता; पंतप्रधान मोदींच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे, वाचा सविस्तर

नाशिक-विदर्भ प्रवाशांसाठी खुशखबर! 'स्पेशल'चा टॅग हटला, नाशिक रोड-बडनेरा मेमू आता नियमित, १६ स्थानकांना थांबा

Video : अवघ्या ५ मिनिटांच्या उशिराची 'अशी' शिक्षा? डिलिव्हरी बॉयचा मोबाईल हिसकावून फ्लॅटमध्ये नेलं अन्...

CJP चे Instagram हँडल अचानक बंद, काही तासांत पुन्हा सुरू; अभिजीत दिपके म्हणाले - 'स्वातंत्र्यदिनी आमचा आवाज...

Navi Mumbai Airport : 'पिंगा'च्या तालावर थिरकल्या तिरंगी पताका; स्वातंत्र्यदिनाची भन्नाट सजावट सोशल मीडियावर व्हायरल; VIDEO