राष्ट्रीय

मोदींचा उत्तराधिकारी त्यांच्यापेक्षाही कट्टर असेल! योगी आदित्यनाथ की हिमंता बिस्वा सरमा? : प्रशांत किशोर

Swapnil S

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेली दहा वर्षे भाजपला एकहाती सत्ता मिळवून दिली. देश-विदेशात देशाची आणि पर्यायाने भाजपची प्रतिमा उजळ केली. कलम ३७० सारखा अडचणीचा प्रश्न सोडवला. आता देखील ते २०२४ च्या निवडणुकीसाठी कंबर कसून उभे आहेत. पण, त्यांचेही वय आता होत आले आहे. यामुळे त्यांचा उत्तराधिकारी कोण, असा प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात नेहमीच उपस्थित होत आहे. या प्रश्नाचे उत्तर निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी दिले आहे. ते म्हणतात की, मोदींचा उत्तराधिकारी त्यांच्यापेक्षाही कट्टर असेल.

प्रशांत किशोर यांनी भाजपसंदर्भात मोठे भाष्य केले आहे. ‘‘आज भाजप सर्व निवडणुका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बळावर जिंकत आहे. ही भाजपची मोठी ताकद आहे, पण हीच भाजपची सर्वात मोठी समस्याही आहे. कारण ते पंतप्रधान नरेंद्र मोदींवर अधिक अवलंबून आहेत,’’ असे प्रशांत किशोर यांनी म्हटले आहे. याचवेळी, पंतप्रधान नरेंद्र मोदींनंतर भाजपचे नेतृत्व कोण करणार? असा प्रश्न विचारला असता? किशोर म्हणाले, ‘‘त्यांच्यानंतर हायकमांड कोण असेल हे माहीत नाही, पण जो कोणी असेल तो त्यांच्यापेक्षाही कट्टर असेल. भाजपमध्ये देशपातळीवर सध्या दोन व्यक्तींची नावे घेण्यासारखी आहेत. एक म्हणजे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ व दुसरे म्हणजे आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा.

योगी आदित्यनाथ आणि सरमा हे दोन्ही फायरब्रॅन्ड व निर्भीड नेते आहेत. कठोर व झटपट निर्णय घेऊन अंमलबजावणी करण्यात त्यांचा हातखंडा आहे. मात्र, पंतप्रधानपदाच्या दृष्टिकोनातून विचार केल्यास शिक्षण व अन्य बाबतीत सरमा योगींपेक्षा उजवे ठरतात. यामुळे मोदींचे उत्तराधिकारी हिमंता बिस्वा सरमा तर नाहीत ना, अशी शंका मनात येते.

'त्या' कंपनीचे अजून ८ बेकायदा होर्डिंग्ज, BMC ची रेल्वेला नोटीस; पालिकेने होर्डिंग हटवल्यास खर्च रेल्वेकडून वसूल करणार

विभवकुमारने केली लाथाबुक्क्यांनी मारहाण; स्वाती मालीवाल यांनी नोंदविला 'एफआयआर'

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या दीड तासांचा ब्लॉक, 'या' वेळेत वाहतूक राहणार बंद

छगन भुजबळ नाराज; प्रचारात फारसे सक्रिय नसल्याने चर्चांना उधाण

सिंचन घोटाळ्यात तथ्य, मात्र अजितदादा दोषी नाहीत - फडणवीस