राष्ट्रीय

Viral Video : वृंदावनमध्ये माकडाने iPhone पळवला, परत मिळवण्यासाठी मालकाची शक्कल बघाच

उत्तर प्रदेशातील वृंदावनमध्ये एका माकडाने पर्यटकाचा महागडा अ‍ॅपल आयफोन पळवला...

Swapnil S

भारत असो वा अन्य कोणताही देश, खायला न मिळाल्यास माकडांचा उपद्रव सर्वत्र पाहायला मिळतो. सोशल मीडियावर असे अनेक व्हिडिओ बघायला मिळतात, ज्यामध्ये माकडे लोकांना विशेषतः पर्यटकांना त्रास देताना दिसतात. एका माकडाचा असाच व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये माकड एका पर्यटकाचा महागडा अ‍ॅपल आयफोन पळवतो. अनेक प्रयत्न करूनही माकड काही फोन परत देण्यास तयार नसतो.

उत्तर प्रदेशातील वृंदावन या पवित्र शहरातील ही घटना असल्याचे समजते. मंदिराच्या भिंतीवर काही माकडं बसलेली दिसतात. त्यापैकी एका माकडाच्या हातात आयफोन आहे, तर फोनचा मालक मात्र रस्त्यावर लोकांच्या गर्दीत उभा आहे. माकडाकडून फोन परत मिळवण्यासाठी हा माणूस भन्नाट शक्कल लढवतो. तो रस्त्यावरूनच माकडाच्या दिशेने वारंवार 'मँगो फ्रूटी' फेकून 'लाच' देण्याचा प्रयत्न करतो आणि अखेरीस माकडही त्यात फसतो. फ्रूटी जवळ येताच हातातील आयफोन सोडून माकड फ्रूटी कॅच करतो आणि खाली उभ्या असलेल्या लोकांच्या गर्दीत आयफोन फेकून देतो. अशाप्रकारे मालक कसाबसा आपला आयफोन परत मिळवतो.

इंस्टाग्रामवर 8.3 दशलक्षपेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडिओ बघितला असून नेटिझन्सनी विनोदी कमेंट्स करीत टिप्पणी विभाग भरून टाकला आहे. "वृंदावनची माकडे सर्वोत्तम व्यापारी आहेत", "हमारे नटखत कान्हा की नटखट सेना" "उसे अपनी गर्लफ्रेंड को कॉल करना था" अशा अनेक मजेशीर प्रतिक्रिया व्हिडिओखाली बघायला मिळत आहेत.

Mumbai : वडाळ्यात ट्रॅफिक बदल; 'हा' रस्ता २२ मेपर्यंत बंद, जाणून घ्या पर्यायी मार्ग

'राजमाता जिजाऊ' बस सेवेचा शुभारंभ; ३,००० नव्या गाड्यांमुळे राज्यातील सार्वजनिक वाहतुकीला चालना

मुंबईकरांसाठी महत्त्वाची सूचना; २८ मार्चला 'या' भागांत पाणीपुरवठा बंद, पाणी साठवण्याचे BMCचे आवाहन

रॅपर बादशाह दुसऱ्यांदा विवाहबंधनात; अभिनेत्री ईशा रिखीसोबत गुपचूप बांधली लग्नगाठ, सोशल मीडियावर Photo व्हायरल

Mumbai : विक्रोळी स्थानकात विनातिकीट प्रवाशांवर रेल्वेची धडक कारवाई; १ लाखांहून अधिक दंड वसूल