File Photo 
राष्ट्रीय

आई व मुलगा कार अपघातात ठार

Swapnil S

बाराबंकी :  बाराबंकी जिल्ह्यात राणी बाजार येथे एक मोटार रस्त्यानजीकच्या डबक्यात पडून मोटारीतील आई व तिचा दहा वर्षांचा मुलगा यांचा मृत्यू झाला तर अन्य सहा कुटुंबीय जखमी झाले. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ही दुर्घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले.  चंदनपूर येथे एका गृहप्रवेश कार्यक्रमासाठी हगे कुटुंबीय सोमवारी संध्याकाळी गेले तेथून परत येताना ही दुर्घटना घडल्याचे मंगळावीर पोलिसांनी सांगितले. नीलम (४०) व अमन (१०) अशी मरण पावलेल्या मायलेकांची नावे आहेत.

मुंबईत आज पाऊस बरसणार; १६ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रासह 'या' राज्यांत मुसळधारचा IMD चा इशारा

विधानसभेचे रणशिंग फुंकणार; दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे भिडणार!

IND vs BAN 3rd T20I : टीम इंडिया आज क्लीन स्वीपचे 'तोरण' बांधणार; 'या' ४ खेळाडूंना संधी मिळणार?

रतन टाटांचा वारसदार मिळाला; नोएल टाटा बनले टाटा ट्रस्टचे चेअरमन

इस्रायलचा लेबनॉनमधील संयुक्त राष्ट्रांच्या इमारतीवर हल्ला; भारताकडून चिंता व्यक्त