राष्ट्रीय

या शिंदे गटाच्या खासदाराने घेतली पंतप्रधानांची भेट; सीमावादावर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची केली तक्रार

गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतरही कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई हे चिथावणीखोर वक्तव्य करण्यावरून केली तक्रार

प्रतिनिधी

सध्या महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावर दोन्ही राज्यांमध्ये मोठ्या घडामोडी सुरु आहेत. अशामध्ये कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई हे सातत्याने सीमावादावर चिथावणीखोर वक्तव्ये केली जात आहेत. यावरून आता शिवसेना शिंदे गटाचे खासदार धैर्यशील माने यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे तक्रार केली आहे. 'दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत गृहमंत्री अमित शाह यांनी घेतलेल्या बैठकीनंतरही मुख्यमंत्री बोम्मई हे सीमावादामध्ये तेल ओतण्याचे काम करत आहेत,' असे पंतप्रधान मोदींना त्यांनी सांगितले. खासदार धैर्यशील माने यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली होती.

खासदार धिरयाशील माने यांनी सांगितले की, "मला पंतप्रधान मोदींना शेतकरी, ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बाबतीत माहिती द्यायची होती. तसेच सध्या सुरु असलेल्या सीमावादावर मी त्यांची मुद्दामहून भेट घेतली. सध्या यावर होत असलेल्या वक्तव्यांची माहिती मी त्यांना दिली. सीमाभागामध्ये काय स्थिती आहे?, सीमावासियांच्या काय भावना आहेत? याची त्यांनी माहिती घेतली. गेल्या आठवड्यामध्ये दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत बैठक झाली होती. त्यांनंतरही वादग्रस्त वक्तव्ये केली जात आहेत. काल कर्नाटकच्या विधानसभेत त्याची वाच्चता झाली, हेदेखील त्यांच्या निदर्शनास आणून दिले. या वक्तव्याने सीमावासियांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना आपण सूचना द्याव्यात, म्हणजे सीमावासियांवर कोणतेही दडपण येऊ नये."

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी